Akola News : एकीकडे विकसित राष्ट्राचे ढोल बडवले जात असताना देशातील आरोग्य व्यवस्था किती तकलादू आहे, याचा प्रत्यय अकोल्यात आलाआहे. यासंदर्भातएकव्हिडिओसध्या व्हायरल होत असूनअकोला (Akola News) जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील अव्यवस्था आणि अमानवीयतेचा चेहरा समोर त्यातूनपुढे आलाआहे. ब्रेन स्ट्रोक (Brain Stroke Patient) आलेल्या रुग्ण पतीला स्ट्रेचर नसल्याने थेट पाठीवर बसवत त्याच्या पत्नीची उपचारासाठी धावपळ सुरू असल्यास विदारक चित्र यात दिसतंय.
Akola News : पतीच्या उपचारार्थ हृदय हेलावून टाकणारा पत्नीचा संघर्ष
अकोला जिल्ह्य सर्वोपचार रुग्णालयात हा संतापजनक प्रकारअसूनया व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर शासकीय रुग्णालयातील गंभीर व्यवस्थापन आणि त्यातील त्रुटी पुन्हा चर्चेत आलीय. रुग्णालयात उपाचारार्थ दाखल करताना स्ट्रेचर वेळेवर न मिळाल्यामुळे थेट एका महिलेने आपल्या पतीला पाठीवर नेत रुग्णालयात दाखल केलंय. निश्चितच पतीच्या उपचारार्थ हृदय हेलावून टाकणारा पत्नीचा हा संघर्ष पाहायला मिळालाय. पोटाला बांधलेली बॅग आणि पाठीवर घेतलेल्या पतीला, अशा अवस्थेत डॉक्टर, नर्स आणि उपचार कक्षाचा शोध घेत असल्याचा याव्हिडीओनंतर प्रशसनाविरोधातरोषउमटतअसल्याचेचित्रआहे.
Akola Crime News : अकोल्यात 2 देशी बनावट पिस्टलसह काडतूसे जप्त; लूटमारी करण्यासाठी वापर, तिघांना अटक
अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने 'ऑपरेशन प्रहार अंतर्गत मोठी कारवाई केलीय. 2 देशी बनवाट पिस्टल आणि दोन जिवंत काडतूसे जप्त केलीये. दरम्यान, अकोला शहरात जबरी चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध घेत असताना ही कारवाई केलीय. या प्रकरणात अतिश सूर्यवंशी, अभिषेक डोंगरे आणि सूरज सोनटक्के या तिघांना अटक केली. हे तिघे लुटमारी करण्यासाठी बंदुकीचा वापर करत होते.
Amravati News : जनगणनेसाठी जाण्याच्या तयारीत असलेल्या शिक्षकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू
जनगणनेसाठी जाण्याच्या तयारीत असलेल्या एका शिक्षकाचा शनिवारी सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झालाय. प्रदीप गणोरकर (वय 50) असे मृत शिक्षकाचे नाव आहे. ते वरूड तालुक्यातील करजगाव येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत कार्यरत होते. प्रदीप गणोरकर यांच्या आकस्मिक निधनाबद्दल शिक्षक संघटनांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून त्यांच्या कुटुंबाला न्याय व आर्थिक आधार मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे. गणोरकर यांची करजगाव परिसरातच जनगणना प्रगणक म्हणून नियुक्ती झाली होती. शनिवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास गणोरकर जनगणनेसाठी निघाले होते. मात्र, अचानक छातीत असह्य कळा येऊ लागल्याने ते घराकडे परतले. प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने पारडसिंगा मार्गावरील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली.
इतर महत्वाच्या बातम्या
