Sanjay Raut : दिल्लीतील 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (SP) अध्यक्ष शरद पवारही (Sharad Pawar) उपस्थित होते. यावेळी शरद पवारांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक केल्याचं पाहायला मिळालं. यावरुनच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला. यावेळी राऊत म्हणाले की,  करु दे ना कौतुक, स्वाताध्यक्ष व्यक्तीला तो शिष्टाचारा पाळावा लागतो, तो शरद  पवार साहेबांनी पाळल्याचे राऊत म्हणाले. पवारांचं स्टेटस मोदींपेक्षा जास्त आहे. पवाारांचा राजकारणाचा अनुभव मोठा आहे. ते टोलेजंग व्यक्तीमत्त्व आहेत. मोदींना राजकीयदृष्टया मदत करणारी दोन नाव आहेत. पहिलं नाव बाळासाहेब ठाकरे आणि दुसर नाव शरद पवार असल्याचे राऊत म्हणाले. 


पवारांचं स्टेटस मोदींपेक्षा जास्त


शरद पवारांना खुर्चीवर बसायला पंतप्रधान मोदींनी मदत केली, यावर देखील संजय राऊतांना विचारण्यात आले. यावेळी राऊत म्हणाले की, त्यांच्या जागी दुसरं कोणी असतं तरी तेच केलं असतं. राहुल गांधीही खर्गे साहेबांसाठी तेच करतात असे राऊत म्हणाले. पवारांचं स्टेटस मोदींपेक्षा जास्त आहे. राजकारणाचा अनुभव पवाारांचा.. टोलेजंग आहे असे राऊत म्हणाले. तुम्ही संमेलनाला जाणार का? असा देखील सवाल प्रसारमाध्यमांनी राऊतांना विचारला. यावेळी राऊत म्हणाले की, मुख्य मैदान तालकटोरा इथे उद्घाटनाला जायला हवं होतं. तिथं परिक्षा पे चर्चा हा कार्यक्रम तुमचा झाला, मग सुरक्षेचा काय प्रश्न. कवी-साहित्यिक- पुस्तकविक्रिेते त्यांच्यापासून काय तुम्हाला धोका. मला ते रहस्य कळत नाही असेही राऊत म्हणाले. 


 पंतप्रधानांनी मराठी भाषेसाठी, साहित्य संमेलनाला साजेसं भाषण केलं


मी तेव्हाचे पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरुंचं भाषणही वाचलयं. आता मोदींचंही  भाषण ऐकलं आहे. पंतप्रधानांनी मराठी भाषेसाठी, साहित्य संमेलनाला साजेसं भाषण केलं आहे. प्रत्यक्ष जी जागा आहे, तिथे लोक ताटकाळतायेत. मोदींची भाषणं आवडत नाही असं नाही. तेव्हा त्यांची भाषणं चांगली होती. आताची भाषण खूपचं साचेबंद, एका पक्षाचे नेते म्हणून प्रधानमंत्र्यांनी बोलू नये असेही राऊतच म्हणाले. आज दिल्लीत 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे (SP) अध्यक्ष शरद पवार यांच्यासह संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते झाले. 


महत्वाच्या बातम्या:


Narendra Modi and Sharad Pawar : आधी हात पकडून दीपप्रज्वलन, मग मोदींनी पवारांसाठी स्वत: पाण्याचा ग्लास भरला! Video