जालना : जालन्यात (Jalna Protest) झालेल्या लाठीचार्जविरोधात राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे जालन्यातील घटनेनंतर मराठा आरक्षणाच्या हालचालींना आता वेग आला आहे. आज मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक  दुपारी 12 वाजता सह्याद्रीवर पार पडणार आहे. बुलढाण्यातील शासन आपल्या दारी कार्यक्रम, पुण्यातील विविध कार्यक्रमांना गैरहजर राहिल्यानंतर आजच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हजर राहणार का ? याकडे सगळ्यांच लक्ष लागले आहे. 


दादांच्या अनुपस्थितीवरुन विरोधकांची टीका


राज्य शासनाच्या बुलढाण्यातील शासन आपल्या दारी कार्यक्रमाला, पुण्यातील विविध कार्यक्रमांना अजित पवार उपस्थित नव्हते. त्यामुळंच राजकीय वर्तुळात पुन्हा एका चर्चेला सुरुवात झालीय. जालन्याच्या लाठीमार प्रकरणानंतर अजित पवारांनी अनेक कार्यक्रमांना दांडी मारली त्यामुळे जालन्यातील घटनेनंतर महायुतीतील राष्ट्रवादीत नाराजीच्या चर्चा सुरू झाल्या आहे. विरोधकांना  आयता मुद्दा मिळाला आहे.  दादांच्या अनुपस्थितीवरुन विरोधकांनी टीका केली आहे. 


प्रकृती ठीक नसल्याने  अजित पवारांचे कार्यक्रम राखीव


आज सलग तिसऱ्या दिवशी देखील अजित पवारांचे सगळे कार्यक्रम राखीव आहेत.  मागील दोन दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेतलेला नाही. त्यामुळे आजच्या  मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ उपसमितीची बैठकीला देखील  उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे. मात्र  अजित पवारांची प्रकृती ठीक नसल्याने  त्यांचे कार्यक्रम राखीव ठेवण्यात आल्याची माहिती अजित पवार यांच्या कार्यालयने दिली आहे. 


मराठा  आंदोलकांवर लाठीमार झाल्याने अजित पवार नाराज


अजित पवार गटाची मराठा आरक्षण मिळावी हीच भूमिका असल्याची माहिती आहे. जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा  आंदोलकांवर लाठीमार झाल्याने अजित पवार शिवसेना आणि भाजपवर नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे अजित पवारांनी आपले  नियोजित कार्यक्रम रद्द केले आहे. अजित पवार आमदारांसह लवकरत आंदोलन स्थळी जाऊन भेट घेणार आहेत.


मुख्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण 


बुलढाण्यात शासन आपल्या दारी कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित न राहिल्यानं चर्चांना उधाण आलं. मात्र त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमात बोलताना या चर्चांना फुलस्टॉप दिला. फडणवीस हे भारतीय लष्कराच्या कार्यक्रमासाठी लडाखला गेलेत आणि अजित पवारांची तब्ब्येत बरी नसल्यानं ते दोघे कार्यक्रमाला गैरहजर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसंच आमचं सरकार घट्ट आहे. असं देखील मुख्यमंत्र्यांनी  सांगितले. 


हे ही वाचा :


 


Raj Thackeray Jalna : जालन्यातील मराठा आंदोलनकांची राज ठाकरे आज भेट घेणार; जखमींचीही करणार विचारपूस