नागपूर : नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सलग दुसऱ्या आठवड्यात सरकारला धारेवर धरण्याची एकही संधी भाजपचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे सोडलेली नाही. हे कमी म्हणून की काय वेळोवेळी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्यासाठी विरोधकांकडून अजित पवार सरसावताना दिसत आहेत.


सरकारला अडचणीत आणणाऱ्या प्रत्येक प्रश्नाला उपप्रश्न विचारुन खडसे सरकारला खडे बोल सुनावतात, तर अजित पवारांकडून त्या प्रश्नाबाबत चिंता व्यक्त करत गंभीर दखल घेण्यासाठी तगादा लावला जातो. यामध्ये अनेकदा सरकारमधल्या भाजप-शिवसेना आमदार देखील विरोधाचा सूर मिसळून सरकारला घरचा आहेर देऊन टाकतात.

यामुळे सरकार आणि विरोधकांमध्ये सामना रंगण्याऐवजी विरोधकांनाच सरकारमधल्या असंतुष्ठ गटाची रसद मिळत असल्याचं चित्र सभागृहाच्या फ्लोअर मॅनेजमेंटमध्ये दिसून येत आहे.

कुठल्या मुद्द्यांवर चव्हाट्यावर आली सरकारची अंतर्गत धुसफूस?

1) आज (सोमवार) प्रश्नोत्तराच्या तासाला पृथ्वीराज चव्हाणांनी हाफकीन महामंडळात निविदा प्रक्रियेत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणात खडसेंनी सरकारच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले.

2) तर वाई येथील अवैध विक्रीसाठी पाठवलेल्या धान्य जप्तीच्या प्रकरणात शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई, सुभाष साबणे यांच्या मदतीला भाजप आमदार सरदार तारासिंग, भीमराव धोंडे, सुनील देशमुख आणि विरोधकांकडून अजित पवार धावले. या सर्वांनी अन्न नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांना चांगलंच अडचणीत आणलं

3) तर गेल्या आठवड्यात एकनाथ खडसेंनी टोल मुक्त महाराष्ट्राची घोषणा आणि रोहयो कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरून चंद्रकांत दादांना अडचणीत आणलं तर पंकजा मुंडेंना थेट झापलं होतं.

संबंधित बातम्या :

एकनाथ खडसेंनी विधानसभेत पंकजा मुंडेंना झापलं!

संघात एखादा गाढव जरी आला, तरी तो माणूस होतो : खडसे

भाजपला सत्तेत आणणारे बाहेर, अन् राणेंसारखे ‘त्यागी’ सत्तेत : खडसे

माझी अवस्था अडवाणींसारखी, एकनाथ खडसेंची मार्मिक टिपणी

खडसे, चव्हाणांनी नियम दाखवला, सरकारची अडचण

खडसेंचा एकच इशारा... प्रशासन खडबडून जागं!