पिंपरी-चिंचवड: राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून होणाऱ्या संभाव्य चुका टाळण्यासाठी अजित पवारांनी राष्ट्रवादी  काँग्रेसच्या विद्यार्थी मेळाव्यात अमूल्य मार्गदर्शन केलं.


'पदं हातात आल्यानंतर मुलींना छेडू नका, जबाबदारीनं वागा, नाहीतर पक्षाचं नुकसान होतं', असंही अजित पवारांनी ठणकावून सांगितलं. ते पिंपरी-चिंचवडमध्ये बोलत होते. राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या पदांवर काही विद्यार्थ्यांची नेमणूक करण्यात आली. त्यावेळी बोलताना अजित पवारांनी कार्यकर्त्यांना कडक शब्दात बजावलं.

'कोणतीही महिला भगिनी तुमच्याजवळ काही काम घेऊन आली तर ते भावाचं नात्यानं तुम्ही पूर्ण कराल असा तिला विश्वास असला पाहिजे. त्यामुळे तुम्ही आता जास्त जबाबदारीनं वागलं पाहिजे. कारण की, तुम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी झाले आहात.' असंही अजित पवार म्हणाले.