Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आी आहे. आज अजित पवार मालेगाव, धुळे आणि जळगाव दौऱ्यावर आहेत. अजित पवार यांची विशेष काळजी घेण्याच्या गुप्त वार्ता विभागाच्या सूचनेनंतर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. गुप्तवार्ता विभागाच्या सूचनेनंतर पोलिसांनी अजित पवार यांची सुरक्षा वाढवली आहे. 

Continues below advertisement

मालेगावमध्ये माजी आमदार आसिफ शेख यांची अजित पवार घेणार भेट 

अजित  पवार बोलता मालेगावच्या दिशेनं निघाले आहेत. मालेगावमध्ये अजित पवार हे आज माजी आमदार आसिफ शेख यांची भेट घेणार आहेत. आसिफ शेख मालेगाव मध्यमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्याची चाचपणी अजित पवार करणार आहेत. अल्पसंख्याक समाज लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (महायुती) पासून दूर गेल्यानं त्यांना जवळ करण्याचा प्रयत्न आजच्या दौऱ्यात राहणार आहे. आसिफ शेख यांच्या भेटीनंतर अजित पवार धुळे आणि अमळनेरच्या दौऱ्यावर आहेत. माजी आमदार रशीद शेख यांच्या निधनानंतर अजित पवार हे आज त्यांची सांत्वनपर भेट घेणार आहेत. आसिफ शेख यांनी राष्ट्रवादीला ( शरद पवार गट ) सोडचिठ्ठी दिल्याने त्यांच्या भेटीला महत्व आलं आहे. आसिफ शेख हे मालेगाव मध्य मधून उमेदवारी करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.  माजी आमदार आसिफ शेख यांच्या घरी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या ताफ्यातील वाहनांचे चेकिंग करुन पोलिसांनी खात्री देखील केली आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांची जनसन्मान यात्रा

विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर अजित पवार यांची (Ajit Pawar)  जनसन्मान यात्रा (Jansanman Yatra)  सुरु आहे. नाशिकच्या दिंडोरीतून या यात्रेला सुरुवात झाली आहे. या जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून अजित पवार जिल्हानिहाय दौरा करत महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. अजित पवारांच्या या दौऱ्यात त्यांना धोका असून मालेगाव (Malegaon Visit)  दौऱ्यावेळी काळजी घेण्याच्या सूचना पोलिसांनी दिली आहे. अजित पवार आज मालेगाव, धुळे दौऱ्यावर आहेत. अजित पवार यांची विशेष काळजी घेण्याची गुप्त वार्ता विभागाची पोलीस प्रशासनाला सूचना आहे. गुप्तवार्ता विभागाकडून वरील भागात धोकादायक हालचाली अनेक दहशतवादी संघटनांकडून असल्याने विशेष काळजी घेण्याची सूचना  देण्यात आला आहे.  जळगाव जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख महेश्वर रेड्डी यांची अधिकाऱ्यांना पत्राद्वारे माहिती दिली आहे. 

Continues below advertisement

महत्वाच्या बातम्या:

अजित पवारांच्या जीवाला धोका; मालेगाव दौऱ्यावेळी काळजी घ्या, गुप्तवार्ता विभागाचा अलर्ट