Ajit Pawar Funeral Video: उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानमध्ये हजारोंच्या साक्षीनं अखेरचा निरोप देण्यात आला. काल बुधवारी बारामती विमानतळाजवळ धावपट्टीपासून अवघ्या 100 मीटर अंतरावर विमान कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. अजित पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अजित पवारांच्या अंत्यसंस्कारादरम्यान "अजितदादा अमर रहे" चा अखंड जयघोष करण्यात आल्या त्यांचे पुत्र पार्थ आणि जय यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नि दिला. गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप प्रमुख नितीन नवीन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे प्रमुख राज ठाकरे, यांच्यासह अनेक नेते अंत्यसंस्काराला उपस्थित होते.
जय पवारांच्या गळ्यात पडून सुरक्षारक्षक धाय मोकलून रडले
दरम्यान, अंत्यसंस्कारानंतर जय पवार, रोहित पवार यांनी दादांना शेवटचं पाहण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. यावेळी अनेकांना अश्रु अनावर झाले. अजित पवारांची सावलीसारखी साथ देणारे सुरक्षारक्षक सुद्धा आपल्या भावना रोखू शकले नाहीत. त्यामुळे दादांच्या अकाली एक्झिटने त्यांना सुद्धा मानसिक धक्का बसला. यावेळी सुरक्षारक्षकांनी जय पवारांच्या गळ्यात पडून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
इतर महत्वाच्या बातम्या
