Amol Mitkari on Ajit Pawar Plane crash : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारीला झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला होता. यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातशोककळा पसरली आहे. या घटनेनंतर अजित पवार यांच्या विमानाचा अपघात की घात असा सवाल उपस्थित केला जात आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील काही शंका उपस्थित केल्या आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील शंका उपस्थित केल्या आहे. मिटकरींनी विमान अपघाताचा फोटो शेअर करत ब्लॅक बॉक्ससंदर्भात प्रश्न उपस्थित केला आहे. 'विमानाची टेल पूर्णपणे सुस्थितीत, त्यामुळं ब्लॅक बॉक्सला काहीही डॅमेज होण्याचा संबंध येत नाही.', असे मत मिटकरी यांनी व्यक्त केले.
नेमकं काय म्हणाले अमोल मिटकरी?
विमानाचा ब्लॅक बॉक्स हा त्याच्या टेलमध्ये, म्हणजे त्याच्या शेपटीमध्ये असतो. त्याचं कारणच हे असतं की, ज्यावेळी विमानाचा अपघात होतो, त्यावेळी अनेकदा असं निदर्शनास आलंय की, विमानाची टेल ही पूर्णपणे जळत नाही. त्यामुळंच हा ब्लॅक बॉक्स विमानाच्या टेलमध्ये ठेवला जातो अपघात झाला त्या विमानाची शेपटी ही पूर्णपणे सुस्थितीत आहे. ती अजिबात जळालेली नाहीये. त्यामुळं या ब्लॅक बॉक्सला काहीही डॅमेज होण्याचा संबंध येत नाही. तसेच ब्लॅक बॉस असा बनवला गेला असतो की हाय टेम्परेचर मध्ये सुद्धा कितीही आग लागली तरीही ते जळून खाक होत नसतो. आता हा प्रश्न उपस्थित होतो की अपघात झाला त्या विमानाचा ब्लॅक बॉक्स कसा जळला? असा सवाल अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे.
ब्लॅक बॉक्स काहीही डॅमेज होण्याचा संबंध येत नाही
अमोल मिटकरी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर अजित पवारांच्या विमान अपघातानंतरचा फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये त्यांनी विमानाच्या टेल म्हणजेच शेवटीच्या भागाला अॅरोने दाखवत अपघातानंतरही तो सुरक्षित असल्याचे दाखवले. त्यांनी या पोस्टमध्ये ब्लक बॉक्ससंदर्भात प्रश्न उपस्थित केले आहेत. विमानाचा ब्लॅक बॉक्स हा त्याच्या टेलमध्ये म्हणजे त्याच्या शेपटीमध्ये असतो. त्याचं कारणच हे असतं की, ज्यावेळी विमानाचा अपघात होतो, त्यावेळी अनेकदा असं निदर्शनास आलंय की, विमानाची टेल ही पूर्णपणे जळत नाही. त्यामुळंच हा ब्लॅक बॉक्स विमानाच्या टेलमध्ये ठेवला जातो. अपघात झालेल्या त्या विमानाची शेपटी ही पूर्णपणे सुस्थितीत आहे. ती अजिबात जळालेली नाहीये. त्यामुळं या ब्लॅक बॉक्सला काहीही डॅमेज होण्याचा संबंध येत नाही.
महत्वाच्या बातम्या: