Praful Patel on Ajit Pawar Plane Crash : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवारच होतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला आहे. 26 फेब्रुवारीला या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीतच सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब होईल असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला आहे. अजितदादांच्या विमान अपघाताचे सत्य समोर आलं पाहिजे. या संपूर्ण प्रकरणाची सीआयडी चौकशीची मागणी आम्ही केल्याचे पटेल म्हणाले. 

Continues below advertisement

अजितदादांच्या अपघाताचे सत्य निश्चितच समोर आलं पाहिजे 

अजितदादांच्या अपघाताचे सत्य निश्चितच समोर आलं पाहिजे असे मत प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांच्या मुद्द्यांना घेऊन मी शेवटचा फोन अजितदादांना केला होता. या संपूर्ण प्रकरणाची सीआयडी चौकशीची मागणी आम्ही केली असल्याचे मत प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केले. 

अजितदादांच्या निधानाने आमच्या पक्षासह महाराष्ट्र आणि देशाची फार मोठी हानी

अजितदादांच्या  विमान अपघाताच्या संदर्भातल संपूर्ण सत्य समोर आल पाहिजे, ही माझी सुद्धा भूमिका आहे. अजितदादांना शेवटचा फोन मीच केलेला होता. अनेक जण माझ्या फोन कॉल्सबाबत वावड्या उठवत वेगवेगळे आरोप होत आहेत. मी शेवटचा फोन शेतकऱ्यांच्या बोनस आणि शेतीच्या मुद्या संदर्भात दादांना केलेला होता. मला माहित नव्हतं दादा कुठे होते. मात्र अपघात घडला ही यात आमची आमच्या पक्षाची महाराष्ट्राची आणि देशाची फार मोठी हानी झालेली आहे. अपघातानंतर या संपूर्ण प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी आम्ही केंद्रीय मंत्र्यांकडे लावून धरली. महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससुद्धा या संपूर्ण प्रकरणाची सीआयडी चौकशी लावण्याचे आदेश दिलेले आहेत असे पटेल म्हणाले.

Continues below advertisement

रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार यांच्या विमान अपघातामागे घातपात असू शकतो, असा खळबळजनक दावा केला होता. या प्रकरणी तज्ज्ञ समिती नेमून सखोल चौकशी करावी, तसेच फौजदारी गुन्हा दाखल करून तपास व्हावा, अशी मागणी त्यांनी केली. अपघातग्रस्त विमान चालवणाऱ्या ‘व्हीएसआर व्हेंचर्स’ कंपनीच्या मालकांचे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांशी आणि त्यांच्या पक्षाशी ‘मैत्रीपूर्ण’ संबंध असल्याचा आरोप करत निष्पक्ष चौकशीबाबत शंका उपस्थित करण्यात आली होती.

महत्वाच्या बातम्या:

Jaykumar Gore on Rohit Pawar: स्वतःच्या राजकीय पुनर्वसनासाठी दादांच्या मृत्यूचं भांडवल करू नका; जयकुमार गोरेंचा रोहित पवारांवर निशाणा, राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबतही बोलले