Suraj Chavan on Ajit Pawar plane crash News : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारीला विमान अपघातात मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला की घात? असा प्रश्न उपस्थित केा जात आहे. अजित पवार यांच्या विमा अपघाताबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. यानंतर अजित पवार यांचे निकटवर्तीय असणारे सुरज चव्हाण यांनी देखील चौकशीच्या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. अजितदादांच्या अपघाताबद्दलची चौकशी नेमकी कुठपर्यंत आली याची माहिती महाराष्ट्राच्या जनतेला भेटली पाहिजे. राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन चौकशीची माहिती महाराष्ट्राच्या जनतेला द्यावी, अशी मागणी सुरज चव्हाण यांनी केली आहे.
नेमकं काय म्हणाले सुरज चव्हाण?
अजितदादांच्या अपघाताबद्दलची चौकशी नेमकी कुठपर्यंत आली याची माहिती महाराष्ट्राच्या जनतेला भेटली पाहिजे. राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन चौकशीची माहिती महाराष्ट्राच्या जनतेला द्यावी, असी मागणी सुरज चव्हाण यांनी केली आहे. राज्य सरकार कडून केंद्र सरकारला विनंती करावी या प्रकरणात आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणेकडून याचा तपास करावा. अपघाताच सत्य महाराष्ट्राच्या जनतेसमोर सत्य आलं पाहिजे ही विनंती असल्याचे सुरज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
रोहित पवारांनी उपस्थित केल्या शंका
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार आणि अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी काही शंका उपस्थित केल्या आहे. विमान टेक ऑफ पूर्वी चेकअप झालं होतं का? असा प्रश्न उपस्थित करत, रोहित पवारांनी "विमानाचा टेकलॉग (Techlog) कुठे आहे आणि विमानाचा एअरवर्दी रिपोर्ट (Airworthy Report) कुठे आहे? असे प्रश्न विचारले होते. टेकलॉगमध्ये मेंटनन्ससंबंधी माहिती असते तर एअरवर्दी रिपोर्टमध्ये विमान हवेत उडण्यास योग्य आहे की नाही, याचा तपशील असतो. याबरोबरच, टेक-ऑफपूर्वी विमान चेक करणारे कर्मचारी कोण होते? याची माहिती आणि त्यांची चौकशीही गरजेची असल्याचं रोहित पवार म्हणाले. रोहित पवारांनी याबाबत अत्यंत गंभीर शंका उपस्थित केली. हे सगळे खोटे रिपोर्ट तयार केले जाऊ शकतात, त्यामुळं या सगळ्याचे सीसीटीव्ही फुटेजही पाहावे लागतील,असं रोहित पवार म्हणाले. पायलटला उड्डाणानंतर ठराविक वेळेचा गॅप किंवा विश्रांती द्यावी लागते, पण याबाबत कंपनी नियमांचं उल्लंघन आणि कागदपत्रांवर वैमानिकांच्या उड्डाणाच्या तासांमध्ये फेरफार करत असल्याचं रोहित पवार म्हणाले. विमानातील सर्वात महत्त्वाचं कॉकपिट व्हाईस रेकॉर्डर वारंवार बंद ठेवलं जातं, तसंच विमान आणि दरम्यान पाळली जाणारी चेकलिस्ट वापरण्याची पद्धत नसल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच, विमानांच्या देखभालीकडं कंपनीकडून दुर्लक्ष केलं जातं, असा आरोपही त्यांनी केला.