Amol Mitkari on Ajit Pawar plane crash News : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघात झालेल्या विमानाचा कोसळण्याआधीच स्फोट झाल्याचा दावा विमानतळा नजीकच्या गोजुबावीच्या काही नागरिकांनी केला होता. या नागरिकांचा हा दावा खासदार बजरंग सोनवणे यांच्या आरोपाला पुष्टी देणारा असल्याचे मत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केलं आहे. खासदार बजरंग सोनावणे यांनी अजित पवारांच्या विमानात स्फोटक होती का? अशी शंका उपस्थित केली होती. यावर मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

Continues below advertisement

संपूर्ण विमान अपघाताची चौकशी उच्चस्तरीय बाह्य यंत्रणांकडून करावी, मिटकरींची मागणी

दरम्यान, या संपूर्ण विमान अपघाताची चौकशी उच्चस्तरीय बाह्य यंत्रणांकडून करण्याची मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या सीआयडी चौकशीला काही मर्यादा येत असल्याच ते म्हणाले. दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार लवकरच राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांशी संवाद साधणार आहेत. यावर बोलताना आमदार अमोल मिटकरी यांनी सुनेत्रावहिनी या आईच्या भूमिकेतून प्रत्येक कार्यकर्त्याशी बोलत असल्याचे ते म्हणाले. दादांच्या जाण्याने पक्ष कार्यकर्ते पदाधिकारी, आमदार, खासदार सैरभैर झाल्याचे ते म्हणाले. अशाने परिस्थितीत कुटुंबप्रमुख म्हणून सुनेत्रा वहिनींचा संवाद हा प्रत्येक कार्यकर्त्याला बळ देणार असल्याचच ते म्हणाले. 

आमदार रोहित पवार यांच्याकडूनही अनेक शंका उपस्थित

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारीला विमान अपघातात मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला की घात? असा प्रश्न उपस्थित केा जात आहे. अजित पवार यांच्या विमा अपघाताबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. विमान टेक ऑफ पूर्वी चेकअप झालं होतं का? असा प्रश्न उपस्थित करत, रोहित पवारांनी "विमानाचा टेकलॉग (Techlog) कुठे आहे आणि विमानाचा एअरवर्दी रिपोर्ट (Airworthy Report) कुठे आहे? असे प्रश्न विचारले होते. टेकलॉगमध्ये मेंटनन्ससंबंधी माहिती असते तर एअरवर्दी रिपोर्टमध्ये विमान हवेत उडण्यास योग्य आहे की नाही, याचा तपशील असतो. याबरोबरच, टेक-ऑफपूर्वी विमान चेक करणारे कर्मचारी कोण होते? याची माहिती आणि त्यांची चौकशीही गरजेची असल्याचं रोहित पवार म्हणाले. रोहित पवारांनी याबाबत अत्यंत गंभीर शंका उपस्थित केली. हे सगळे खोटे रिपोर्ट तयार केले जाऊ शकतात, त्यामुळं या सगळ्याचे सीसीटीव्ही फुटेजही पाहावे लागतील,असं रोहित पवार म्हणाले. पायलटला उड्डाणानंतर ठराविक वेळेचा गॅप किंवा विश्रांती द्यावी लागते, पण याबाबत कंपनी नियमांचं उल्लंघन आणि कागदपत्रांवर वैमानिकांच्या उड्डाणाच्या तासांमध्ये फेरफार करत असल्याचं रोहित पवार म्हणाले. विमानातील सर्वात महत्त्वाचं कॉकपिट व्हाईस रेकॉर्डर वारंवार बंद ठेवलं जातं, तसंच विमान आणि दरम्यान पाळली जाणारी चेकलिस्ट वापरण्याची पद्धत नसल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच, विमानांच्या देखभालीकडं कंपनीकडून दुर्लक्ष केलं जातं, असा आरोपही त्यांनी केला.

Continues below advertisement