Ajit pawar plane crash : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमानाचा अपघातात (Ajit Pawar Baramati Plane Crash) मृत्यू झाला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार बारामतीमध्ये येत असताना अजित पवारांचा हा अपघाती मृत्यू झाला. या घटनेनंतर सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या अपघाताची माहिती कळताच मंत्री हसन मुश्रीफ यांची नात ढसाढसा रडल्याचं पाहालया मिळालं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचं दिसून येत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मृत्यूनंतर, कोल्हापुरात मंत्री मुश्रीफांची नात झाली भावूक
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांचा आज सकाळी विमान अपघातात मृत्यू झाला आहे. यानंतर राज्यात शोककळा पसरली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ हेही बारामतीला रवाना झाले आहेत. तर कागलमध्ये मुश्रीफ यांची लहानगी नात आयेझा मुश्रीफ हिला या अपघाताची माहिती कळताच तीही भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. कागलमध्ये सभेच्या वेळी अनेकदा अजित पवार यांच्यासोबत तिची भेट झाली होती. त्यामुळे अपघाताची माहिती कळताच तिला अश्रू अनावर झाले.
Baramati Plane Crash Timeline : अपघात नेमका कसा झाला?
1. सकाळी 8.10 मिनिटं
मुंबईतून लियरजेट 45 XR विमानाचं उपमुख्यमंत्री अजित पवारांचं बारामतीकडे उड्डाण झालं. त्यामध्ये अजितदादांसह पाच जणांचा समावेश होता.
2. सकाळी 8.40 मिनिटं
विमान बारामती एअरस्ट्रीपच्या अगदी जवळ होतं, त्यावेळी विमानात काही तांत्रिक बिघाड झाला.
3. सकाळी 8.46 मिनिटं
तांत्रिक बिघाडामुळे वैमानिकाचं विमानावरचं नियंत्रण सुटलं आणि बारामतीतील गोजुबावी परिसरातील शेतात विमान कोसळलं. त्यामध्ये अजित पवारांसह सर्व जणांचा मृत्यू झाला.
Ajit Pawar Plane Crash : विमानात कोण कोण होते?
अजित पवारविदीप जाधवपिंकी माळीकॅप्टन सुमित कपूरकॅप्टन शांभवी पाठक
Ajit Pawar Plane Crash Timeline : विमान अपघाताचा घटनाक्रम
पुणे-बारामती परिसरात दाट धुके, दृश्यमानता अत्यंत कमी होती. बारामतीचे विमानतळ लहान आहे आणि त्याच्याकडे ILS (Instrument Landing System) सुविधा नाही. त्यामुळे पायलटला मॅन्युअल लँडिंग करावी लागली. विमानाने रनवेवर थेट प्रवेश केला नाही, तर मोठा वळसा घेतला. याचा अर्थ पहिला लँडिंग प्रयत्न रद्द (aborted) केला गेला. धुक्यात रनवेवर (align) करणे कठीण झाले. दुसरा लँडिंग प्रयत्न केला गेला. याचवेळी पायलटने MAYDAY कॉल जारी केला. DGCAच्या सूत्रांनुसार, हे टेबल-टॉप रनवे आहे. लँडिंगदरम्यान विमान रनवेच्या कडेला कोसळले. सुमारे 100 फूट उंचीवर विमानाचा तोल गेला. रनवेपर्यंत पोहोचण्याआधीच विमान जमिनीवर आदळले.विमान जमीनीवर आदळल्यावर मोठा स्फोट झाला, त्यानंतर अनेक लहान स्फोट झाले. त्यानंतर विमानात भीषण आग लागली.आगीमुळे तात्काळ बचावकार्य शक्य झाले नाही.अपघाताचा तपास चालू आहे, DGCA अहवालानंतर अंतिम कारण निश्चित होईल.
महत्वाच्या बातम्या: