मुंबई : शब्दाचे पक्के आणि करारी नेते अशी ओळख असलेल्या अजित पवारांच्या (Ajit Pawar) तत्परतेचे अनेक किस्से सांगितले जातात. कुणाचं काही चुकलं तर कशाचीही भीड न बाळगता अजितदादा समोरच्याला फैलावर घेतात याचा अनुभव अनेकांना अनेकदा आला आहे. आताही परभणीतील आमदार, खासदारांना त्यांची प्रचिती आली. दोन टक्के कमिशन मागणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या अधिकाऱ्याची तक्रार आल्यानंतर दादांनी त्याला फैलावर घेतलं आणि जाग्यावरच बदली केली. 

नेमकं काय आहे प्रकरण?

परभणी जिल्हा नियोजन समितीत जिल्हा नियोजन अधिकारी दोन टक्के कमिशन मागत असल्याचं प्रकरण समोर आलं होतं. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कमिशन मागणाऱ्या अधिकाऱ्याला मंत्रालयात बोलावून चांगलंच झापलं. नंतर त्या अधिकाऱ्याला प्रशासकीय कारणास्तव तात्काळ कार्यमुक्त केलं आणि मंत्रालयातील अर्थ व साख्यिकी संचालनालयात बदली केली. कि. गु. परदेशी (K G Pardeshi) असं या अधिकाऱ्याचं नाव असून या प्रकरणाची आता जोरदार चर्चा सुरू आहे. 

नुकतीच परभणी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. त्यावेळी जिल्हा नियोजन अधिकाऱ्याकडून दोन टक्के कमिशन मागण्यात येत आहे असा आरोप आमदार आणि खासदारांनी केला होता. कि गु परदेशी या जिल्हा नियोजन अधिकाऱ्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर त्यांना तत्काळ कार्यमुक्त करत त्यांच्या पदाचा पदभार रा. गं. ढोकणे यांच्याकडे देण्यात आला. 

परदेशी यांना मुंबईतील अर्थ आणि साख्यिकी संचालनालयात बदली करण्यात आली असून त्यांना तात्काळ हजर राहण्यास सांगितलं आहे. 

ही बातमी वाचा: