Ajit Pawar: गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संत धार पावसाने पुण्यासह बारामतीत दाणादाण उडाली .रविवारी अनेक ठिकाणी पावसाचे पाणी घरात घुसले .मीरा डावा कालवा फुटल्याने कालव्याचे पाणी शेतकऱ्यांच्या घरामध्ये घुसून शेतजमीन वाहून गेली .मोठ्या प्रमाणावर पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती . दरम्यान या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे, इंदापूर, बारामतीच्या पट्ट्यात फिरत आहेत . बारामती दौंड इंदापूर ची वर्षाची सरासरी 14 इंच एवढी आहे 13 इंच पाऊस एका दिवसाला पडलाय .काही ठिकाणी सात सात इंच पाऊस पडला .नीरा डावा कालव्यासह आणखी एक कालवा फुटल्याने लोकांच्या घरात पाणी शिरलं .दरम्यान अधिकाऱ्यांना नुकसानाचे पंचनामे करायला सांगितले आहेत . अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली .

Continues below advertisement


काय म्हणाले अजित पवार ?


इंडियाची काल दिल्लीला मिटिंग होती .आम्ही दिल्लीत होतो .अचानक पुणे जिल्ह्यामध्ये पावसाचे वातावरण तसेच सगळ्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात पाऊस आहे .काही ठिकाणी हाय अलर्ट डिक्लेअर केला आहे . माझी आई 87 वर्षाची आहे .आईचं लग्न झालं त्याला 51 वर्ष झाली .तेव्हापासून एवढा पाऊस आईनेही पाहिला नाही .बारामती दौंड इंदापूर ची वार्षिक सरासरी 14 इंच आहे .13 इंच पाऊस एका दिवसात पडला .काही ठिकाणी सात सात इंच पाऊस पडला .लोकांच्या घरात पाणी शिरलं . सोनगाव, ढेकळवाडी ,इंदापूर अनेक भागात लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलंय .अधिकाऱ्यांना या संदर्भात पंचनामे करण्यास सांगितलं आहे . 


शेतकऱ्यांचा मोठा नुकसान झालाय . मागासवर्गीय समाजातील अनेकांची घरं पडली आहेत .चाऱ्याची अथक अतिक्रमणे झाली .तिथेही काही सूचना अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले . दिलेल्या आणि त्यालाही पण निधी काही ठिकाणी अतिक्रमण झाले काही ठिकाणी साऱ्यांमध्ये पण अतिक्रमण झाले तर तिथं पण काही सूचना आम्ही दिलेली त्यालाही पण निधी देण्याच्या बद्दल मी आणि कलेक्टरने ठरवलेलं आहे .  लोकांना सांगितलं आहे की  तुम्ही कोणी साऱ्यांच्या मध्ये अतिक्रमण करू नका .जेवढी काय राज्य सरकारच्या मालकीची चारी असेल त्याच्यामध्ये दुतर्फा दोन्ही बाजूला शेतकऱ्यांना जायला यायला तर रस्त्याची नितांत गरज असते.


पंचनामे आम्ही सुरू केलेत


अचानक पुणे जिल्ह्यामध्ये पावसाचं वातावरण सगळ्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात आहे. काही ठिकाणी हाय अलर्ट डिक्लेअर केलेला आहे.माझी आई 87 वर्षांची आहे आईचं लग्न झालं त्याला 51 वर्ष झाली ती इथे आली तेव्हापासून एवढा पाऊस आईनेही पाहीला नाही..बारामती दौंड इंदापूरची वर्षाची सरासरी वर्षाची 14 इंच. 13इंच पाऊस एका दिवसात पडला. काही ठिकाणी 7 - 7 इंच पाऊस पडला. निरा डावा कालवा फुटला. पंचनामे करायचा सांगितले.चाऱ्यामध्ये अतिक्रमण करू नये. सध्या लाईट बंद आहे. जिथं काही धोका नाही तिथं लाईट चालू करू. हवामान खाते म्हणत रेड अलर्ट आहे पाऊस येईल.100 वर्षात एवढा पाऊस मे महिन्यात..पंचनामे आम्ही सुरू केलेत..पाऊस आणि कालवा फुटला त्याचे पाणी त्यामुळे पाऊस पडला.इमारती ला भेगा पडल्या त्याची पाहणी केली. आता पाणी एवढं झालं आहे त्यामुळे कॅनॉल सुरू करणार नाही. पालखीला कॅनॉल सुरू करू.काल शेत पाणीमय झालं होतं .आता पाणी ओसरला आहे.आमच्याकडे 1/7 शेतकरी ऊस लावायचे पण आता वापसा येणार नाही. दुपारी पंतप्रधान यांच्या सोबत होतो त्यावेळी त्यांना सांगितले आमच्या महाराष्ट्र मध्ये पाऊस पडतोय.


आता पेरण्या केल्या तर वाया जातील


सरकार म्हणून जी काळजी घ्यायला पाहिजे .ज्यांच नुकसान झालं त्यांना शिफ्ट करण्यात आली आहे. त्यांची चांगली सोय होईल.आम्ही नोंद घेतली. आपण तुमच्या ज्ञानात भर घातली. ज्यांची घर पडली आहेत त्यांना कॅबिनेट म्हणून विषय मांडू, राज्य सरकार पुढाकार घेऊन नुकसान भरपाई देऊ.Ndrf ची दोन टीम आली आहे.लोकांना सुस्थळी आणण्याचे काम आहे.किती नुकसान झाले हे समजू शकले नाही, ही काय जादूची कांडी नाही संध्याकाळी प्रेस नोट काढून माहिती देऊ.काल आम्ही सगळे एकत्र नागपूरला आलो. आता पेरण्या केल्या आणि पुन्हा पावसाने ओढ दिली तर पेरण्या वाया जातील, त्यामुळे कृषी विभागाने पेरणी करु नका आम्ही सांगू तेव्हा पेरणी करा.अतिक्रमण काढणायची भूमिका आम्ही घेऊ.ओढ्याच्या कडेला लोकांचे नुकसान झालं आहे. ज्यांचं नुकसान झालं त्यांना भरपाई देऊ.


हेही वाचा