मुंबई : मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या अत्यंत गंभीर आरोपांनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता इशारा दिला. आपल्या मुख्यमंत्र्यांनी दसऱ्याला शपथ घेतली आणि मार्ग काढायचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, प्रत्येकाला विरोध करायचा अधिकार आहे, पण आपण काय बोलतो, कोणाला बोलतोय, हे बघण्याची गरज आहे. राज्याचे प्रमुख दोनवेळा जालन्यात गेले, नवी मुंबईत गेले. मराठा आरक्षणाचा पृथ्वीराज चव्हाण यांनी निर्णय घेतला होता, देवेंद्रजी यांनी निर्णय घेतला होता, पण आता जाणीवपूर्वक योग्य रितीने सर्व केलेले आहे, पण कोणीही गैरसमज करू नये की काहीही बोलले की खपते, सर्वांना कायदा समान आहे, हे विसरू नये, असा इशारा जरांगे पाटील यांना दिला.  

Continues below advertisement

त्यांनी पुढे सांगितले की, आपल्या महाराष्ट्रात ज्या वेगवेगळ्या घटना घडत आहेत. ड्रग्जचा उल्लेखही झाला. पुण्यात नव्या पोलिस आयुक्तांनी तपास केला आणि लंडनपर्यंत धागेदोरे पोहोचले आहेत. याचे कौतुक करायचं सोडून, उगीच काहीतरी बोलत आहेत. काल देवेंद्रजी यांनी पोलिसांना 25 लाखांचे पक्षित जाहीर केले आहे, पण त्याबद्दल पण टीका करायची, निव्वळ टीका करायचा उद्योग त्यांच्याकडे राहिला आहे अशी टीका त्यांनी केली. 

आरक्षण देऊन मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला : देवेंद्र फडणवीस 

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देऊन शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळला असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. प्रत्येक ठिकाणी मदत करण्याचे धोरण सरकारने घेतलं आहे. राज्यात गुंतवणूक देखील येत असल्याचे ते म्हणाले. फडणवीस यांनी विरोधकांकडून पत्रकार परिषद घेतली गेली नसल्याने टीका केली.  

Continues below advertisement

प्रत्येकाने आपल्या मर्यादेत राहिलं पाहिजे

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मराठा आरक्षण 10 टक्के देण्याचा निर्णय घेतला. ओबीसी समाज, इतर समाजाला धक्का न लावता आरक्षण देण्याची आमची भूमिका होती. काही लोक म्हणतात टिकणार नाही. आम्ही आरक्षण दिलं आहे, तुम्ही तर दिलं नाही. त्यामुळे का टिकणार नाही? याची कारणं द्या. दिलेलं आरक्षण हे टिकणारं आहे. कोर्टाने मांडलेल्या बाबींचा अंतर्भाव आम्ही केला आहे, सगळ्या त्रुटी दूर केल्या आहेत. प्रत्येकाने आपल्या मर्यादेत राहील पाहिजे, कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होतं कामा नये. कोणाला वाटत असेल सरकरला काही माहिती नाही. सरकार, गृह विभाग सगळं लक्ष ठेवून असल्याचे ते म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या