पिंपरी चिंचवड : अजितदादा साडेचार महिने पिंपरीत का आले नाहीत. कारण पराभवाने ते नाराज आहेत. शहराचा कायापालट करूनही विरोधात बसावं लागलं, याचं शल्य नक्कीच त्यांना असणार, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले. शिवाय, पिंपरी-चिंचवडचा इतका विकास करुन आपला पराभव का झाला?, याचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे, असेही त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना सांगितलं. ते पिंपरी-चिंचवडमधील मेळाव्यात बोलत होते.


सोशल मीडियाचा वापर कटाक्षाने करा. जनतेपर्यंत या माध्यमातून पोहोचा, असा सल्लाही सुनिल तटकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला.

“अजितदादांना संघटनेच्या कामासाठी आसूड हातात घ्यायला लागू नये.”, असं म्हणत तटकरेंनी कार्यकर्त्यांना तंबी दिली. शिवाय, आसूड कुणासाठी घ्या, हे म्हणालो, ते प्रत्येकाने स्वतःच्या मनाला विचारावं, असा इशाराही तटकरेंनी दिला.

कर्जमाफीवरुन सरकारवर टीकास्त्र

कर्जमाफी जाहीर केल्यापासून रोज नवीन परिपत्रक काढलं जातंय. यामुळे शेतकरी गोंधळला आहे, असे म्हणत सुनील तटकरेंनी सरकावर टीका केली. मुंबईसारख्या शहरातील शेतकऱ्यांची कर्जमाफीमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ही यादी तपासण्याची गरज असल्याचेही तटकरे म्हणाले.