Ajit Pawar on Rohit Pawar : रोहित (Rohit Pawar) माझ्यासोबत असताना मी किती कोटींचा निधी दिला याची माहिती घ्या असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं. बऱ्याच लोकांनी म्हटलं की MIDC आणणार पण आली का MIDC? असा सवाल करत अजित पवार यांनी आमदार रोहित पवारांना टोला लगावला. आता MIDC आणण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे, असे अजित पवार म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित अहिल्यानगर जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांचा राष्ट्रवादी (AP) पक्षात प्रवेश झाला. यावेळी अजित पवार बोलत होते. अण्णासाहेब शेलार यांनी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उमेदवारी दिली होती. अण्णासाहेब शेलार यांच्या रुपाने राष्ट्रवादी AP ला श्रीगोंद्यात बळ मिळणार आहे.
अहिल्यानगरच्या कारखान्यांची काय अवस्था आहे?
अहिल्यानगरच्या कारखान्यांची काय अवस्था आहे? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. मी कारखान्यांची नावं घेणार नाही. नाहीतर काही लोक फोन करुन म्हणतील जामखेडच्या भाषणात आमच्या कारखान्याचं कशाला काढलं? पण जनतेने कारखाना, जिल्हा बँक, सोसायट्यांकडे लक्ष ठेवले पाहिजे. अनेक संस्थांची वाईट परिस्थिती झाली आहे. बारामतीचा विकास काही उगीच झालेला नाही. कामं करावी लागतात असे अजित पवार म्हणाले. जामखेडमधील रखडलेल्या रस्त्यासाठी मी वेळप्रसंगी नितीन गडकरी साहेबांशी बोलेल असे अजित पवार म्हणाले. मी रस्त्यांची कामं करण्यासाठी वेळप्रसंगी लोकांशी वाईटपणा घेतला. काही जणांची घर काढावी लागल्याचे अजित पवार म्हणाले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याला शोभेल असे स्मारक उभारणार
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याला शोभेल असे स्मारक अहिल्यानगर जिल्ह्यात उभारणार असल्याचे अजित पवार म्हणाले. अर्थ खातं आपल्याकडे असल्यानं या स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही असे अजित पवार म्हणाले. आपल्याला काम अत्यंत चोख केलेलं लागत असेही ते म्हणाले.
जो माणूस योग्य दिशेने कामं करतो त्याच्या मागे उभं राहा
वाद घालून कुणाचं भल झालेलं नाही. जो माणूस योग्य दिशेने कामं करतो त्याच्या मागे उभं राहा असे अजित पवार म्हणाले. मी कधीही कुणावर टीका करत नाही. जनतेने त्यांचं काम केलं आहे, लाडक्या बहिणीने आमचं काम केलं आहे असे अजित पवार म्हणाले. त्यामुळं वाद करत बसू नका, असे अजित पवार म्हणाले. आमच्या मतदारसंघातील कामाकडे माझे बारीक लक्ष असते. बारामतीतील इमारती कशा आहेत? ते उगीच नाही. जनतेला माझी विनंती आहे की जात धर्म प्रांत यावरून समाजात तेढ निर्माण होऊ देऊ नका असे अजित पवार म्हणाले. आपल्या घरात आलेल्या लेकी बाळीना सांगा एक किंवा दोन आपत्यवर थांबा. नाहीतर ब्रम्हदेव आला तरी भविष्यात पाणी पुरणार नाही असे अजित पवार म्हणाले.