मुंबई : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी 'रक्षाबंधन' साजरं केलं. यावेळी त्यांचे कुटुंबीयही उपस्थित होते.




अजित पवार यांना राजकीय क्षेत्रासह अवघ्या महाराष्ट्रात ‘दादा’ म्हणून ओळखलं जातं, तर सुप्रिया सुळे यांना ‘ताई’ संबोधलं जातं. रक्षाबंधनाच्या पवित्र दिनी सुप्रियाताईंनी आपल्या भावाला म्हणजेच अजितदादांना राखी बांधली.

https://twitter.com/supriya_sule/status/894401246974550018

सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावंडांसोबत साजरा केलेल्या रक्षाबंधनाचे फोटो ट्विटरवर शेअर केले. “आजचा रक्षाबंधनाचा सण कुटुंबियांसोबत साजरा केला. सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.!!”, असे सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर फोटो पोस्ट करुन लिहिले आहे.