Ahmedabad Air India Plane Crash : गुजरातमधील अहमदाबादमध्ये प्रवासी विमान कोसळून भीषण दुर्घटना  (Ahmadabad Plane Crash) घडली आहे.  यामध्ये तब्बल 242 प्रवाशी होते. हे विमान दुपारी दीडच्या सुमारास उड्डाण केलं होतं. अहमदाबादवरुन लंडनला निघालेलं एअर इंडियाचं प्रवासी विमान (Air India Plane ) उड्डाणाच्या काही मिनिटातच कोसळलं. मिळालेल्या माहितीनुसार, या विमानातून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील प्रवास करत होते. याबरोबरच राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांच्या भाच्याची पत्नी अपर्णा महाडिक (Aparna Mahadik) या देखील एअर इंडियाच्या क्रूमध्ये होत्या. विमानातील क्रू मेंबर्सची नावे आली आली आहेत. यामध्ये क्लाईव्ह कुंदर-फर्स्ट ऑफिसर, सुमित सबरवाल, अपर्णा महाडिक, श्रद्धा धवन-केबिन एक्झिक्युटिव्ह 1, दीपक पाठक-केबिन एक्झिक्यूटिव्ह 2, इरफान शेख, नंथेम सिंगसेन, मैथिली पाटील असे आठजण होते. यापैकी अपर्णा महाडिक या तटकरे यांच्या नात्यातील आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अपर्णा महाडिक या सुनील तटकरेंचे भाचे अमोल यांच्या पत्नी होत्या. अमोल देखील स्वतः एअर इंडिया मध्ये पायलट आहेत. दोन तासापूर्वी ते दिल्लीत लँड झाले आणि आता ते अहमदाबादला जाणार आहेत असे त्यांच्या परिवाराने सांगितले आहे. या अपघाताची माहिती मिळताच खासदार सुनील तटकरे माजी आमदार अनिकेत तटकरे, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे हे  आपल्या वहिनी राहत असलेल्या मुंबई गोरेगाव ईस्ट  येथील निवासस्थानी पोहोचले असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे.

700 फुटांवरुन मेघानीनगर ह्या नागरी वस्तीत हे विमान कोसळलं

गुजरातमधील अहमदाबाद इथे एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला असून 700 फुटांवरुन मेघानीनगर ह्या नागरी वस्तीत हे विमान कोसळलं. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी व प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. विमानातून 10 क्रू मेंबरांसह तब्बल 242 प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. विमान अपघाताचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले असून, जिथे प्लेन क्रॅश झालं, त्याठिकाणी धुराचे मोठे लोळ पसरल्याचं व्हिडिओतून दिसून येत आहे, घटनास्थळी विविध बचाव पथक दाखल झाले आहेत. मात्र, या दुर्घटनेत मोठी जिवितहानी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अहमदाबादहून लंडनला म्हणजेच दूर मार्गावर जाणार असल्याने या विमानात इंधन देखील मोठ्या प्रमाणात भरण्यात आलं होतं, त्यामुळे अपघातानंतर दुर्घटनास्थळी मोठा स्फोट झाला. विशेष म्हणजे विमान दुर्घटनेपूर्वी विमानाचे पायलट कॅप्टन सुमित सभरवाल यांनी आपत्कालीनचा संदेश (मे डे कॉल) दिला होता. कॅप्टन सभरवाल यांना तब्बल 8200 तासांच्या प्रवास उड्डाणाचा अनुभव होता. विमानाने दुपारी 1.31 वाजता उड्डाण केल्यानंतर 1.38 मिनिटांनी विमानाचा शेवटचा सिग्नल मिळाला होता. त्यानंतर, ही दुर्घटना घडली.

महत्वाच्या बातम्या:

Ahmedabad plane crash : गुजरातमध्ये 242 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान रहिवासी भागात कोसळलं!