एक्स्प्लोर

Air Fest Nagpur : नागपूरकरांनी अनुभवला हवाई थरार, वायूवीरांच्या चित्तथरारक कवायती

Nagpur : 'आकाशगंगा' या पथकाचे दहा लढवय्यांनी आठ हजार फूट उंचावर या चित्तथरारक आणि श्वास रोखून धरणाऱ्या हवाई कसरती एअर फेस्टमध्ये सादर केल्या.

Nagpur News : वायुविरांच्या चित्तथरारक कसरती शनिवारी नागपूरकरांना (Nagpur) अनुभवायला मिळाल्या. डोळ्याचं पारणं फेडणारी प्रात्यक्षिकं वायूवीरांनी (Indian Air Force)  सादर केली. यात सूर्यकिरण एरोबॅटिक, सारंग हेलिकॉप्टरच्या चमूने हवाई कवायतीने नागपूरकरांचे लक्ष वेधले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या 'एअर फेस्ट'मध्ये (Air Fest 2022) चित्तथरारक आणि श्वास रोखून धरणाऱ्या कसरतींची पर्वणी यानिमित्ताने मिळाली. कोरोनामुळे दोन वर्षांच्या अंतराने यंदा एअर शो झाला. नागपूरातील वायुसेना नगरातील मेंटेनन्स कमांडच्या परेड मैदानावर शनिवारी निमंत्रितांना हवाई थरार अनुभवता आला. याप्रसंगी लढाऊ आणि मालवाहतूक करणाऱ्या विमानांची प्रात्यक्षिके पाहण्यासाठी नागरिकांनी तळाच्या भोवतीच्या परिसरातील घरांच्या छतांवर गर्दी केली होती.

एअरोमॉडेलिंग शो, वायुसेनेच्या बॅण्ड पथकाचे सादरीकरण या एअर फेस्टचे विशेष आकर्षण ठरले. यंदाच्या शोमध्ये सुखोईचा समावेश नव्हता. त्यामुळे भारतीय वायुसेनेचा (IAF) कणा असलेल्या अत्याधुनिक अशा या लढाऊ विमानाच्या हवाई कसरतींना नागपूरकर मुकले. 'आकाशगंगा' या पथकाचे दहा लढवय्ये आठ हजार फूट उंचावर या चित्तथरारक आणि श्वास रोखून धरणाऱ्या हवाई कसरती आणि प्रात्यक्षिके सादर केली. यामध्ये सूर्य किरण एरोबॅटिक टीम, सारंग हेलिकॉप्टर एअर डिस्प्ले टीम, आकाशगंगा टीम आणि एअर वॉरियर ड्रिल टीम यांचा समावेश होता. इतर उपक्रमांमध्ये पॅरा हँड ग्लायडिंग, वाहतूक आणि लढाऊ विमानांद्वारे फ्लायपास्ट, आयएएफ उपकरणांचे प्रदर्शन, एरो-मॉडेलिंग आणि एअर फोर्स बँड सादरीकरण पाहायला मिळाले.

आकाशगंगा टीमने तिरंगा ध्वज उंच नेला. आणि शेवटी संघातील तीन सदस्य तिरंगा घेऊन उतरले. हा उपस्थितांसाठी अभिमानाचा क्षण होता. डॉर्नियर विमानातून आठ हजार फूट उंचीवर स्कायडायव्हिंग करण्यात आले. या चित्तथरारक प्रात्यक्षिकाने नागपूरकर थक्क झाले. अ‍ॅवेरो हे मध्यम आकाराचे वाहतूक विमान जमिनीपासून 500 फूट उंचीवर उडत होते.

निवडक देशांकडेच एरोबॅटिक डिस्प्ले चमू

संपूर्ण जगात चार ते पाच देशांमध्ये सूर्यकिरणसारख्या एरोबॅटिक डिस्प्ले टीम आहेत. त्यातील सूर्यकिरण ही सर्वोत्तम अशा स्वरूपाची असून ती देशाचा सन्मान वाढवित असल्याची माहिती सूर्यकिरणच्या चमूतील फ्लाइट लेफ्टनंट आणि टीम कॉमेंटेटर रिद्धिमा गुरुंग यांनी दिली.

सूर्यकरिण चमूमध्ये...

'सूर्यकिरण'च्या सध्याच्या चमूमध्ये ग्रुप कॅप्टन जी. एस. ढिल्लन, विंग कमांडर ए. यादव, विंग कमांडर आर. बोरदोलोई, विंग कमांडर ए. गावकर, विंग कमांडर एन. रैना, विंग कमांडर पी. नेगी, स्क्वॉड्रन लीडर पी. भारद्वाज, स्क्वाड्रन लीडर डी. गर्ग, स्क्वाड्रन लीडर एच. चंदेल, स्क्वाड्रन लीडर एस. दयाल, स्क्वाड्रन लीडर एम. भल्ला, स्क्वाड्रन लीडर अ‍ॅलन जॉर्ज, स्क्वाड्रन लीडर एच. सिंग, स्क्वाड्रन लीडर सुदर्शन, फ्लाइट लेफ्टनंट रिद्धिमा गुरुंग यांचा समावेश आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Embed widget