Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने (Maharashtra Government) मोठा निर्णय घेतला आहे. समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) लवकरच एअर अॅम्ब्युलन्स (Air Ambulance) सेवा करण्यात येणार आहे. यासाठी अनेक हेलिकॉप्टर कंपन्यांशी राज्य सरकारचं बोलणं सुरु आहे. अपघात (Accident) झाल्यास त्वरित सेवा मिळावी यासाठी नागपूर ते मुंबई दरम्यानच्या खाजगी तसंच महत्त्वाच्या हॉस्पिटलसोबत राज्य सरकार करार करणार आहे. अपघात झाल्यास तात्काळ वैद्यकीय सेवा मिळावा यासाठी एअर अॅम्ब्युलन्स आणि हाॅस्पिटलची सेवा मळावा यासाठी लवकरच राज्य सरकार संबंधित कंपन्यांशी करार करणार आहे.


समृद्धी महामार्ग राज्याच्या विदर्भ भागाला राजधानी मुंबईला जोडण्यासाठी असलेला महत्त्वकांक्षी महामार्ग. जवळपास साडेपाच हजार कोटी रुपये खर्च करुन बांधण्यात आलेला हा महामार्ग आता मृत्यूचा सापळा म्हणून या महामार्गाची ओळख व्हायला लागली आहे. नागपूर ते मुंबई असा 701 किलोमीटरचा सरळसोट असलेला हा महामार्ग आहे आणि त्यामुळे या महामार्गावर वाहन चालवताना वाहन चालक हे रोड हिप्नोसिसचे बळी ठरत आहेत. यामुळे अपघातांचे प्रमाणही मोठं आहे. मागील वर्षी डिसेंबरमध्ये म्हणजेच सात महिन्यांपूर्वी समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाला. या सात महिन्यांच्या कालावधीत 1000 अपघात झाले आहेत. त्यात 100 पेक्षा अधिक प्रवाशांचा बळी गेला आहे. या कालावधीत कोणत्याही 'समृद्धी एक्स्प्रेस वे'वर झालेली ही सर्वात मोठी हानी आहे.


बुलढाण्यातील अपघातात 26 जणांचा मृत्यू


समृद्धी महामार्गावर नुकत्याच सिंदखेडराजाजवळ झालेल्या भीषण अपघातात 26 जणांचा बळी गेला. बस उलटल्यानंतर लागलेल्या आगीत प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. त्यानंतर या महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अपघातांची वेगवेगळी कारणं सांगितली जातात. दुसरीकडे, हा महामार्ग मृत्यूचा सापळा ठरत आहे.


या महामार्गावर गेल्या सहा महिन्यात किती मोठे आणि कसे अपघात घडले?



  • आतापर्यंत एकूण अपघात 1000 च्या वर

  • गंभीर अपघात ज्यात जीव गेले - 368 अपघात

  • चालकाला झोप येणे किंवा डुलकी येणे -183 अपघात

  • टायर फुटून - 51अपघात 

  • तांत्रिक कारणांमुळे 200 च्या वर अपघात


कसा आहे समृद्धी महामार्ग?



  • राज्यात 701 किलोमीटर रस्त्याच जाळ विणलेला मुंबई- नागपूर समृद्धी महामार्ग

  • यांपैकी शिर्डी ते नागपुर 520 किलोमीटर लांबीचा मार्ग डिसेंबर 2022 मध्ये जनतेसाठी खुला करण्यात आला आहे.

  • तर शिर्डी ते भरवीरपर्यंतचा 80 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग मे महिन्याच्या अखेरपर्यंत जनतेसाठी खुला होण्याची शक्यता आहे.

  • या महामार्गाचे काम जवळपास पूर्ण झाला असून आता उद्घाटनाच्या  तारीखेची घोषणा बाकी आहे. 

  • हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यास शिर्डी-भरवीर अंतर 40-45 मिनिटात पार करता येणार आहे. 

  • तर भरवीर – नागपूर अंतर सहा तासात पार करणे शक्य होणार आहे



VIDEO : Samruddhi Expressway Air Ambulance : समृद्धी महामार्गावर एअर अॅम्ब्युलन्स सुरु करणार, सरकारचा निर्णय