Ahmednagar News Update : अहमदनर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यामधील गांजीभोयरे या गावातील ताईबाई अंकुश झंझाड यांनी चार वर्षाच्या मुलीचा सांभाळ करत बँकिंग परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविले आहे. ताईबाई यांनी या परीक्षेत देशात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे.


गांजीभोयरे येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील अंकुश झंझाड यांची मुलगी ताईबाई यांनी बारावी नंतर  अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कृषी क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. दरम्यान पाडळी दर्या येथील संतोष खोसे यांच्यासोबत ताईबाई यांचा विवाह झाला. लग्नानंतर चूल आणि मूल यात अडकून न राहता ताईबाई यांनी बँकिंग परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या निर्णयाला पती संतोष खोसे यांनी साथ दिली. कुटुंबातील इतरही सदस्यांनी देखील त्यांच्या निर्णयाला पाठींबा दिला. 


एकीकडे चार वर्षाच्या मुलीचा सांभाळ, संसाराची जबाबदारी त्यातच देशपातळीवरील बँकिंग क्षेत्रातील परीक्षेचा अभ्यास करणं कठीण होतं. परंतु, ताईबाई झंझाड यांनी मोठ्या जिद्दीने तब्बल चार वर्षे अभ्यास केला. ताईबाई यांनी या परीक्षेत देशात टॉपर येण्याचा मान मिळवला.पहिल्याच प्रयत्नात त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी कौतुक केले.


महाराष्ट्र ग्रामीण बँकेची परीक्षा पास झाल्यानंतर ताईबाई यांनी बँकिंग क्षेत्रातील इतर परीक्षा देत बँक ऑफ इंडियामध्ये वरिष्ठ अधिकारी पदापर्यंत झेप घेतली आहे. त्यांचं हे यश ग्रामीण भागातील मुलींसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.


कोरोनामुळे परीक्षा पुढे ढकलल्या,पण अभ्यास सुरू ठेवला


मागील दोन वर्षे कोरोनामुळे परीक्षा रद्द झाल्या. परंतु, ताईबाई यांनी आपला अभ्यास सुरूच ठेवला. विशेष म्हणजे त्यांनी परीक्षेच्या तयारीसाठी कोणतीही शिकवणी लावली नाही. केवळ ऑनलाईन व्हिडीओ लेक्चर ऐकून त्यांनी अभ्यास केला. बँकिंगमधील सर्वांत मोठी परीक्षा त्यांनी दिली. ताईबाई प्रत्येक परीक्षेत देशात टॉपर आल्या आहेत. परिस्थिती कशीही असो जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळतेच हे ताईबाई यांनी दाखवून दिले आहे.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI