अहमदनगर : शिर्डीमध्ये तीन गाड्यांचा भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.


बेलापूर-श्रीरामपूर रोडवर आज पहाटे हा भीषण अपघात झाला. स्विफ्ट कार, दुधाचा टँकर आणि इंडिका कार एकमेकांवर धडकली. मात्र यामध्ये स्विफ्ट गाडीतील पाच जणांचा मृत्यू झाला.

ओव्हरटेक करण्याच्या नादात अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. मात्र धुक्यामुळे अपघात झाला काय यादृष्टीनेही पोलिस तपास सुरु आहे.

मृतांमधील दोन जण श्रीरामपूरमधील भैरवनाथजवळचे रहिवाली होते. तर उर्वरित मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे.

दरम्यान, जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.