Ahilyanagar : अहिल्यानगरमधील शनिशिंगणापूर (Shani Shingnapur) देवस्थानने मोठा निर्णय घेतला आहे. शनि देवस्थान इथं कार्यरत असलेले 167 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्यात आले आहे. काढून टाकण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये  114 मुस्लिम कर्मचाऱ्यांचा समावेश होता. अनियमितता आणि शिस्तचं पालन न केल्याच्या कारणावरुन करम्चाऱ्यांना काढण्यात आल्याचे स्पष्टीकरण शनि देवस्थानकडून देण्यात आलं आहे. 

Continues below advertisement

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढण्याबाबत हिंदू संघटनांनी दबाव आणला होता. शनि देवाच्या चौथ्याऱ्यावर मुस्लिम लोकांच्या हाताने काम करुन घेतल्यामुळे सकल हिंदू समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. 

14 जून रोजी मंदिराबाहेर संपूर्ण हिंदू समाजाकडून मोठा मोर्चा काढण्याचा दिला होता इशारा

अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ श्री क्षेत्र शनि शिंगणापूर मंदिरात मुस्लिम कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीवरुन वाद वाढला होता. शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्टमध्ये काम करणाऱ्या 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांविरुद्ध हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. ट्रस्टने सर्व मुस्लिम कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावरुन काढून टाकावे अशी संघटनेची मागणी होती. अन्यथा 14 जून रोजी मंदिराबाहेर संपूर्ण हिंदू समाजाकडून मोठा मोर्चा काढला जाईल, असा इशारा देखील दिला होता. 

Continues below advertisement

21 मे 2025 रोजी मुस्लिम कारागिरांनी मंदिराच्या पवित्र व्यासपीठावर ग्रिल बसवले आणि भगवान शनिदेवाच्या व्यासपीठाची स्वच्छता आणि रंगरंगोटी केली होती. तेव्हा हे प्रकरण अधिकच तापले होते. या घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदू संघटनांनी तीव्र आक्षेप घेतला होता. त्यानंतर आता मंदिराच्या विश्वस्त मंडळाने सर्व मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत मंदिर ट्रस्टने स्पष्टीकरण दिलं होतं, त्यानुसार ट्रस्टमध्ये 114 मुस्लिम कर्मचारी काम करतात हे मान्य केलं आहे. मात्र ट्रस्टच्या म्हणण्यानुसार, या कर्मचाऱ्यांपैकी एकाही मुस्लिम कर्मचाऱ्याची ड्युटी मंदिराच्या मुख्य गर्भगृहात किंवा चबुतऱ्यावर नाही. हे कर्मचारी मुख्यतः शेती विभाग, कचरा व्यवस्थापन विभाग आणि शिक्षणाशी संबंधित कामांमध्ये कार्यरत आहेत. यापैकी 99 कर्मचारी मागील पाच महिन्यांपासून कामावर अनुपस्थित असून त्यांच्या पगारावरही आळा घालण्यात आला आहे. उरलेले 15 कर्मचारी अनेक वर्षांपासून सेवा देत आहेत, ज्यात काहींचा अनुभव 20 वर्षांहून अधिक आहे. शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्टमध्ये काम करणाऱ्या 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकावे या मागणीसाठी हिंदू संघटना आक्रमक झली होती. याबाबत उद्या (14 जून) मोर्चा काढण्याचाही  इशारा दिला होता. 

महत्वाच्या बातम्या:

Ahmednagar News : शनिशिंगणापूर देवस्थानच्या सुरक्षारक्षकावर जीवघेणा हल्ला, कामगारांचा काम बंद आंदोलनाचा इशारा