रोहित पवारांच्या जीवितास धोका, त्यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी, खर्डा पोलीस प्रशासनाला निवेदन
आमदार रोहित पवारांना झेड प्लस सुरक्षा द्यावी, अशी मागणी जामखेड तालुक्यातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
Ahilyanagar : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar Death News) यांचा 28 जानेवारीला विमान अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली होती. दरम्यान, अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत विविध शंका उपस्थित केल्या जात आहेत. विशेषत: या विमान अपघाताबाबत आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी काही खळबळजनक आरोप केले आहेत. याच पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवारांना झेड प्लस सुरक्षा द्यावी, अशी मागणी जामखेड तालुक्यातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. खर्डा येथील पोलीस ठाण्यात पोलीस प्रशासनाला निवेदन देत ही मागणी केली आहे.
रोहित पवारांनी घातपाताची शक्यता व्यक्त केल्याने जीवितास धोका निर्माण होण्याची भीती
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूबाबत रोहित पवारांनी घातपाताची शक्यता व्यक्त केल्याने जीवितास धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, यावेळी बोलताना रोहित पवारांनी दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत खळबळजनक दावा केला आहे. सोबतच यावेळी व्हीआरएस कंपनीवर काही गंभीर आरोप करत भाजपच्या ट्रॉलर्सलाही खडेबोल सुनावले आहे. Rohit Pawar on BJP:
तर मग या कटात भाजपही सहभागी आहे का?
दरम्यान, अकाउंटेबल, फ्लाईट सेफ्टी मॅनेजरची चौकशी झाली का? त्यांना अटक झाली का? या जबाबदार व्यक्ती आहेत. हि व्यक्ती मोठं प्रस्त आहे, म्हणून त्यांना वाचनावण्यात येतंय. यातील एका कंपनी अधिकाऱ्यांवर अत्याचाराचे आरोप आहेत. लायसन्स नसताना अनधिकृतपणे विमान चावण्यात येत होते. तर भाजपचे ट्रोल या पत्रकार परिषदेला ट्रोल करत आहेत. आम्हाला प्रश्न पडतो की भाजपच्या ट्रोलकडून इतका विरोध का? त्या ट्रोलला पैसे कोण देतंय? ते भाजपची बाजू मांडत असतात हे आम्हाला माहिती आहे. यांनी पूर्वी रोहित शेट्टींना ब्लॅकमेल केलं होतं. भाजपचे ट्रोल जर विरोध करतात तर मग या कटात भाजपही सहभागी आहे का? अशी शंका निर्माण होते. असेही रोहित पवार म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनीच या तपासात लक्ष दिले पाहिजे
व्हीएसआर (VSR) नावाच्या कंपनीला खूप मोठ्या लोकांचा पाठिंबा असून यात सत्तेतील आणि राजकीय संबंध असलेले मोठे उद्योगपती सामील आहेत. हे एक राजकीय किंवा व्यावसायिक कटकारस्थान असू शकते आणि डीजीसीएचे मोठे अधिकारीही यामागे आहेत. अजित दादांना न्याय मिळवून देण्यासाठी या देशातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती, म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनीच या तपासात लक्ष दिले पाहिजे, अशी मागणी रोहित पवार .यांनी केली.























