एक्स्प्लोर

धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये कार आणि मालवाहू ट्रकचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

अहिल्यानगर जिह्यात धक्कादायक घटना घडली आहे. जिल्ह्यातील श्रीरामपूर संगमनेर रस्त्यावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.

Ahilyanagar Accident : अहिल्यानगर जिह्यात धक्कादायक घटना घडली आहे. जिल्ह्यातील श्रीरामपूर संगमनेर रस्त्यावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गावाजवळ कार आणि मालवाहू ट्रकचा अपघात झाला आहे. 

कारमधील सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू तर दोनजण गंभीर जखमी 

श्रीरामपूर संगमनेर रस्त्यावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात श्रीरामपूर येथील सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. कारमधील पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू तर दोनजण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. मृतांमध्ये दोन महिला, एक पुरुष आणि दोन लहान बालकांचा समावेश आहे. या भीषण अपघातात श्रीरामपूर येथील एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. 

कालच श्रीगोंदा तालुक्यात झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला होता

कालच अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव - कोळगाव रोडवरील माऊली मंदिरा जवळ भीषण अपघात झाला होता. ट्रक आणि इको कारची समोरा -समोर धडक झाल्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर एक लहान मुलगा गंभीर जखमी झाला होता. मृतांमध्ये चालकासह एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. काल पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे.. नितीन कोकाटे (कारचालक), गजानन पायघन, ध्रुपता पायघन, वैभव पायघन अशी मयत व्यक्तींची नावे आहेत तर करण पायघन या तेरा वर्षीय मुलावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर ट्रक ड्रायव्हर फरार झाला असून बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गावाजवळ सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. कार आणि मालवाहू ट्रॅकचा अपघातात जीवितहानीसह कार चक्काचूर झाली आहे. अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू तर 6 वर्षीय चिमुकल्याची मूत्यूशी झुंज सुरु आहे. कारमधील 4 प्रवाशांचा जागीच तर उपचारा दरम्यान दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.  मृतांमध्ये 24 वर्षीय प्रशांत चव्हाण ,40 वर्षीय संगीता चव्हाण, 16 वर्षीय सिद्धार्थ चव्हाण, 30 वर्षीय सारिका चव्हाण, 3 वर्षीय ऋत्वी चव्हाण आणि 26 वर्षीय ऐश्वर्या चव्हाण यांचा समावेश आहे. 
6 वर्षीय रुद्र चव्हाण  गंभीर जखमी झाल्याने त्यावर लोणी येथील प्रवरा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 10 दिवसांपूर्वी गाडी घेतल्याने खंडाळा येथे पावन गणपतीच्या दर्शनाला चालले होते चव्हाण कुटुंब. ओव्हरटेक करताना माल वाहतूक ट्रकला समोरुन धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
200 रुपये द्या, सिलेंडर देतो; बीडमधील गॅसटंचाईत ग्राहकांकडून पैशांची लूट, एबीपी माझाचं स्टिंग ऑपरेशन
200 रुपये द्या, सिलेंडर देतो; बीडमधील गॅसटंचाईत ग्राहकांकडून पैशांची लूट, एबीपी माझाचं स्टिंग ऑपरेशन
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran : होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
Latur : लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, शैक्षणिक हबमध्ये मेसचालकांसह विद्यार्थी संकटात
लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, हजारो हॉटेल कामगारांचा रोजगार संकटात
Donald Trump : तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण, अमेरिका-इराण संघर्षात नवा ट्विस्ट
तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
Embed widget