बारामतीत महाविद्यालयीन विद्यार्थ्याची आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम | 19 Oct 2016 08:44 AM (IST)
बारामतीः बारामतीच्या कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कृषी महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये आत्महत्या केली. बजरंग ढेरे असं विद्यार्थ्याचं नाव आहे. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून अजून तरी आत्महत्या केल्याचे काहीही पुरावे हाती लागलेले नाहीत. दरम्यान या आत्महत्येने महाविद्यालयात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासात काही कारण समोर येतं का, त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.