Parbhani Farmers Agitation : राज्यात परतीच्या पावसानं (rain) धुमाकूळ घातला आहे. विविध जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. या पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. उभ्या पिकात पाणी साचल्यानं शेतकऱ्यांच्या हाती आलेला घास पावसानं हिरवला आहे. परभणी जिल्ह्यातही अशीच स्थिती झाली आहे. परभणी (Parbhani) जिल्ह्यात सोयाबीनसह कापसाच्या पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. त्यामुळं परभणीच्या मिरखेल येथील शेतकऱ्यांनी पाणी साचलेल्या सोयाबीनच्या शेतात आंदेलन केलं. यावेळी शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.




सोयाबनीन आणि कापूस पाण्यात


परभणी जिल्ह्यात शुक्रर्वारी परतीच्या पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातला होता यातूनच शेतकऱ्यांच्या सोयाबीन आणि कापसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. ठीक ठिकाणी शेतीमध्ये पाणी साचलं आहे. काढणीला आलेलं सोयाबीन असेल किंवा वेचणीला आलेला कापूस असेल हा पाण्यामध्ये पूर्णपणे बुडाला आहे. परभणीच्या मिरखेल येथील शेतकऱ्यांनी हीच परिस्थिती विशद केली आहे. मिरखेल येथील पाणी साचलेल्या सोयाबीनच्या शेतात शेतकऱ्यांनी अर्धनग्न होऊन आंदोलन केले आहे. यावेळी शेतकऱ्यांनी सरकारकडे पीक विमा आणि नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.


आता आमची दिवाळी कशी होणार


सोयाबीनचे पूर्ण शेत जलमय झालं आहे. या कृषी प्रधान देसात शेतकरी राजा आहे, असं सांगितलं जातं की शेतकरी राजा आहे. मात्र, त्याला नावाला राजा ठेवलं आहे. पण त्याचा जगण्याचा पूर्ण अधिकार या प्रशासकीय व्यवस्थेनं हिरावला आहे. त्यामुळं आम्ही आज अर्धनग्न अवस्थेत शासनाचा निषेध करत असल्याची भूमिका शेतकऱ्यांनी मांडली. आज भयानक स्थिती आहे. सोयाबीन कापणीची वेळ आली असताना पावसानं शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. आता आमची दिवाळी कशी होणार, शासन चिन्हात परेशान आहे. आमच्याकडं त्यांच लक्ष नाही. आम्हाला त्वरीत मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. परभणीत परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. सोयाबीन तळहाताच्या फोडाप्रमाणं जपून काढणीला आले असताना मुसळधार पाऊस झाला अन सोयाबीन, कापसात गुडघ्याइतके पाणी साचल्यानं दोन्ही नगदी पीक हातून गेले आहे. पीक विमा कंपनीच्या छाताडावर बसा आणि मदत द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. आमची शासनानं तत्काळ दखल घ्यावी. आमच्या गावात पावसाचा अतिरेक झाला आहे. आमचं मोठं नुकसान झालं आहे, त्यामुळं आम्हाा मदत करा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.  


महत्त्वाच्या बातम्या:


Maharashtra Rains: परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करा; सरकारचे स्पष्ट निर्देश