Dattatray Bharne on Iran War Live Update : इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यातील संघर्ष वाढतच चालला आहे. युद्धाच्या दुसऱ्या महिन्यात प्रवेश करताच, इस्रायलने इराणवर जोरदार हल्ले केले आहेत. अशातचया युद्धाचा भारतासहजगभरातीलअर्थव्यवस्थेलामोठाफटकाबसलाआहे. आखाती देशातील युद्धाचा परिणाम शेतीमालाच्या आयात निर्यातीवर 100% टक्के होणार आहे. देशातील माल निर्यात होत नसल्याने त्याचा फटका बाजारभावावर दिसत आहे. तसेच युरियाचा साठ्याबाबत भविष्यात काळजी घ्यावी लागेल, अशी चिंता राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांनी व्यक्त केली आहे.
Dattatray Bharne: 17 एप्रिलनंतर तापमान वाढणार; शेतकऱ्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा
राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. शेती नुकसानीचा अहवाल आल्यानंतर तातडीने शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत पावसाचं प्रमाण कमी राहणार असल्याने शेतकऱ्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा. उन्हाळा कडक असून 17 एप्रिलनंतर तापमान वाढणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.
Cashew Nut Farmers: कोकणातील काजू उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात
कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी यावर्षी हवामानातील बदलामुळे झालेल्या नुकसानीमुळे संकटात सापडले आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे एकीकडे काजू उत्पादनात 60 ते 65 टक्के घट झाली आहे. तर दुसरीकडे काही प्रमाणात आलेलं उत्पन्न जगली प्राणी तोडून किंवा खाऊन वाया घालवत आल्याने दुहेरी संकटात कोकणातील काजू उत्पादक शेतकरी सापडला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकरी आता जंगली प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीने त्रस्त आहे.
Sindhudurg News : नुकसानग्रस्त यादीत शेकरू प्राण्याचा समावेश करून नुकसान भरपाई द्यावी
राज्य प्राणी शेकरू हिरवी काजू बी खाऊन नुकसान करत असल्याने शेतकऱ्यांच्या हाती काजू बी येत नसल्याने मोठ नुकसान होत आहे. शेकरू हा प्राणी संरक्षित प्राणी असून सिंधुदुर्गात ठिकठिकाणी शेकरूची सख्या वाढली आहे. मात्र आता हा शेकरू प्राणी शेतकऱ्यांच्या काजू बी खाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान करत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. तसेच शेकरू प्राण्याने नुकसान केल्याने नुकसान भरपाई मिळत नाही, कारण नुकसानग्रस्त यादीत शेकरू प्राण्याचा समावेश नाही. त्यामुळे समावेश करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
इतर महत्वाच्याबातम्या
