Kirit Somaiya , Bhagat Singh Koshyari : भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि शिवसेना (Shiv Sena) कार्यकर्त्यांमध्ये पुण्यात (pune) झालेल्या धक्काबुक्कीनंतर

  महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) त्यांची भेट घेतली.  राज्यपालांनी पुण्यातील घटनेसंदर्भात चिंता व्यक्त केली असल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. आता यासंदर्भात किरीट सोमय्या हे दिल्लीत गृह सचिवांना भेटणार असून शुक्रवारी पुन्हा एकदा पुण्यात जाणार आहेत.  हल्ला करणारे एकूण 64 जण असून या 64 जणांना अटक करावी,  असं किरीट सोमय्या यांनी यावेळी म्हटले आहे.
 
पुढे किरीट सोमय्या म्हणाले, 'पुण्यातील घटनेसंदर्भात  राज्यपालांनी चिंता व्यक्त केली.  ते या सगळ्या प्रकरणी राज्य सरकारकडे रिपोर्ट मागवणार आहेत. ते गृहमंत्र्यांशी देखील बोलणार आहेत.'


हल्लेखोरांना अटक न झाल्यास आंदोलन 
किरीट सोमय्या यांनी सांगितलं,  मी गुरूवारी दिल्लीला जावून गृहसचिवांची भेट घेणार आहे. मी येत्या शुक्रवारी पुण्यात चार वाजता जाणार आहे.  हल्ला करणारे 64 जण होते. ते सगळे व्हिडिओमध्ये दिसत आहेत, त्या सगळ्यांना अटक झाली पाहीजे हल्लेखोरांना अटक न झाल्यास मी पुण्यात आंदोलन करणार. पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता हे राज्य सरकारचे ऐकतात.'
 
दगड फेकणा-यांना पोलीसांची मदत
'हे पूर्वनियोजित असल्याचं दिसतय आणि दगड फेकणा-यांना पोलीस मदत केली आहे', असंही सोमय्या म्हणाले. कोव्हीड सेंटरचे कंत्राट सरकारने दिलेच कसे? सुजीत पाटकरला अटक का नाही? असे प्रश्न देखील यावेळी किरीट सोमय्या यांनी उपस्थित केले. पुढे त्यांनी सांगितलं, 'मोदी सरकारच्या कमांडोमुळं मी वाचलो, उद्धव ठाकरेंनी कितीही उद्धटपणा केला, संजय राऊतांनी कितीही धमक्या दिल्या तरी मी भ्रष्टाचार बाहेर काढत राहणार'


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


भाजपला 18 खासदार निवडून देणाऱ्या महाराष्ट्राचा अपमान करणं दुर्दैवी : सुप्रिया सुळे


किरीट सोमय्यांना धक्काबुक्की करणारा शिवसैनिक गजाआड


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha