एक्स्प्लोर

मोदी सरकारनंच अदर पुनावाला यांना धमकी दिली; राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांचा गंभीर आरोप

लसीकरणाच्या मुद्यावरून राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. तसेच मोदी सरकारनंच अदर पुनावाला यांना धमकी दिली, असा गंभीर आरोपही हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केला आहे.

मुंबई : केंद्र सरकारने धमकी दिल्याने सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला लंडनमध्ये गेल्याचा आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केला आहे. पूनावाला यांनी महाराष्ट्राला दीड कोटी लस देण्याचं ठरवलं होतं, अशी माहितीही मुश्रीफ यांनी दिलीय. दरम्यान दोन दिवसांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार असल्याचंही हसन मुश्रीफ यांनी सांगितलं आहे. 

हसन मुश्रीफ बोलताना म्हणाले की, "मुख्यमंत्र्यांनी सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांच्याशी चर्चा केली त्यावेळी जूनपासून दीड कोटी लसी द्यायचं त्यांनी ठरवलं होतं. परंतु, त्यांना केंद्राकडून धमक्या देण्यात आल्या. त्यानंतर ते लंडनला जाऊन बसलेले आहेत. केंद्र सरकारने धमकी दिल्यामुळे त्या लशी राज्याला मिळाल्या नाही. एकीकडे राज्य सरकारला डोस द्यायला सांगायचे आणि दुसरीकडे बाजूला धमक्या देण्याचा प्रकार घडला आहे"

दरम्यान, कोरोना लस उत्पादन करणाऱ्या सिरम संस्थेचे (serum institute) अदर पुनावाला  (Adar Poonawalla) यांनी धमकी दिल्याचा खुलासा केला होता. त्यामुळे हे प्रकरण हायकोर्टात गेले होते. 

आदर पुनावाला यांचे देशासाठी मोठे योगदान, सुरक्षा पुरवा : हायकोर्ट

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अदर पुनावाला यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा गांभीर्याने घ्या, अशी आठवण मंगळवारी पार पडलेल्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारला करून दिली होती. तसेच पुनावाला यांच्या सुरक्षिततेबाबतचा अहवाल पुढील सुनावणीत सादर करण्याचे निर्देश दिले प्रशासनाला दिले होते. कोरोनाच्या कठीण काळात कोविशिल्ड ही लस तयार करून देशाच्या हितासाठी भरीव कामगिरी केली आहे, याचा हायकोर्टानं पुनर्उच्चार केला होता. 

पुनावाला यांना सध्या 'वाय' दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आल्याची माहिती राज्य सरकारच्यावतीने खंडपीठाला देण्यात आली. तर दुसरीकडे, केंद्र सरकारकडून पुनावाला यांच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफचे जवानही तैनात करण्यात आल्याचंही कोर्टात सांगण्यात आलं होतं. त्यावर पुनावाला यांच्या सुरक्षिततेसाठी सीआरपीएफचे किती जवान तैनात करण्यात आले आहेत?, अशी विचारणा खंडपीठाने केली तसेच देश कठीण परिस्थितीतून जात असताना देशासाठी मोठं आणि भरीव योगदान देणाऱ्या पुनावाला यांच्या सुरक्षितेचा मुद्दा गांभीर्याने घ्या, असे केंद्र आणि राज्य सरकारला सुनावत त्यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देश देत खंडपीठाने सुनावणी 10 जूनपर्यंत तहकूब केली होती.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लोकसभेच्या फटक्यानंतर भाजप आता 'ताकही फुंकून पिणार', खुद्द अमित शाहांचं मुंबईवर लक्ष, विधानसभेला मायक्रो प्लॅनिंग
लोकसभेच्या फटक्यानंतर भाजप आता 'ताकही फुंकून पिणार', खुद्द अमित शाहांचं मुंबईवर लक्ष, विधानसभेला मायक्रो प्लॅनिंग
PM Kisan : पीएम किसानचे 2000 रुपये 5 ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, त्यापूर्वी करावं लागणार महत्त्वाचं काम
पीएम किसान सन्मानचे 2 हजार रुपये 5 ऑक्टोबरला शेतकऱ्यांना मिळणार, ई केवायसी करुन घ्या, अन्यथा...
Pune Crime News: पुण्यात महाविद्यालयीन मुलीवर चौघांकडून अत्याचार; सोशल मिडियावरून ओळख अन् वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार, नेमकं काय घडलं?
पुण्यात महाविद्यालयीन मुलीवर चौघांकडून अत्याचार; सोशल मिडियावरून ओळख अन् वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार, नेमकं काय घडलं
Amit Shah : अमित शाहांच्या नाशिक दौऱ्यानंतर भाजप पदाधिकारी अ‍ॅक्शन मोडवर, विधानसभेसाठी आखली 'ही' खास रणनीती
अमित शाहांच्या नाशिक दौऱ्यानंतर भाजप पदाधिकारी अ‍ॅक्शन मोडवर, विधानसभेसाठी आखली 'ही' खास रणनीती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्या Top 80 At 8AM 27 Sept 2024Hingoli Soyabean Loss due to Rain : परतीच्या पावसाने हिंगोलीत सोयाबीनचे नुकसानएबीपी माझा मराठी  न्यूज हेडलाईन्स : ABP Majha Marathi News Headlines: 27 September 2024माझं गाव माझा जिल्हा Majha Gaon Majha Jilha 630AM Superfast 27 Sept 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकसभेच्या फटक्यानंतर भाजप आता 'ताकही फुंकून पिणार', खुद्द अमित शाहांचं मुंबईवर लक्ष, विधानसभेला मायक्रो प्लॅनिंग
लोकसभेच्या फटक्यानंतर भाजप आता 'ताकही फुंकून पिणार', खुद्द अमित शाहांचं मुंबईवर लक्ष, विधानसभेला मायक्रो प्लॅनिंग
PM Kisan : पीएम किसानचे 2000 रुपये 5 ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, त्यापूर्वी करावं लागणार महत्त्वाचं काम
पीएम किसान सन्मानचे 2 हजार रुपये 5 ऑक्टोबरला शेतकऱ्यांना मिळणार, ई केवायसी करुन घ्या, अन्यथा...
Pune Crime News: पुण्यात महाविद्यालयीन मुलीवर चौघांकडून अत्याचार; सोशल मिडियावरून ओळख अन् वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार, नेमकं काय घडलं?
पुण्यात महाविद्यालयीन मुलीवर चौघांकडून अत्याचार; सोशल मिडियावरून ओळख अन् वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार, नेमकं काय घडलं
Amit Shah : अमित शाहांच्या नाशिक दौऱ्यानंतर भाजप पदाधिकारी अ‍ॅक्शन मोडवर, विधानसभेसाठी आखली 'ही' खास रणनीती
अमित शाहांच्या नाशिक दौऱ्यानंतर भाजप पदाधिकारी अ‍ॅक्शन मोडवर, विधानसभेसाठी आखली 'ही' खास रणनीती
Mumbai University Senate Election 2024: मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा आज निकाल, युवासेना Vs अभाविप, कोण मारणार बाजी?
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा आज निकाल, युवासेना Vs अभाविप, कोण मारणार बाजी?
Andheri News : मुसळधार पावसात नाल्यात वाहून गेली महिला, कुटुंबीयांचा आक्रोश
Andheri News : मुसळधार पावसात नाल्यात वाहून गेली महिला, कुटुंबीयांचा आक्रोश
पालघरमध्ये वाढवण बंदराजवळ रिलायन्स 880 एकर जमिनीमध्ये टेक्सटाईल पार्क उभारणार,एमआयडीसीकडून हालचाली सुरु
रिलायन्स पालघरमध्ये प्रस्तावित वाढवण बंदराजवळ टेक्स्टाईल पार्क उभारणार, एमआयडीसीकडून हालचाली सुरु
Sharad Pawar: आता मिशन विधानसभा! अकलूजमध्ये शरद पवार, सुशीलकुमार शिंदे अन् मोहिते पाटील त्रिकुट एकत्र, महायुतीचं  टेन्शन वाढलं?
आता मिशन विधानसभा! अकलूजमध्ये शरद पवार, सुशीलकुमार शिंदे अन् मोहिते पाटील त्रिकुट एकत्र, महायुतीचं टेन्शन वाढलं?
Embed widget