Gunaratna Sadavarte : वकील गुणरत्न सदावर्ते यांनी 'एसटी कष्टकरी जनसंघ' या संघटनेची स्थापना केली असून त्यांनी याबाबत आज अधिकृत घोषणा केली. सदावर्ते यांनी यावेळी जय श्रीराम अशा घोषणा दिल्या. शिवाय त्यांनी यावेळी महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची हत्या केलेल्या नथूराम गोडसे (Nathuram Godse) याच्या नावाचा गोडसेजी असा उल्लेख केला. "गांधीजींनी श्वास सोडताना  'हे राम' म्हटलं होतं असं इतिहासात लिहिलं आहे. परंतु, नथूराम गोडसेजी यांची कोर्टात ट्रायल झाली त्यावेळी गोडसेजी यांनी स्पष्ट केलं होत की महात्मा गांधी यांनी श्वास सोडताना कधीही हे राम म्हटल नव्हतं, असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे. 

Continues below advertisement


सदावर्ते यांनी नव्या संघटनेच्या स्थापनेची घोषणा केल्यानंतर त्यांनी आपली पुढील भूमिका जाहीर केली.  याच वेळी त्यांनी नथूराम गोडसे याच्या नावाचा उल्लेख गोडसेजी असा केला. "गांधीवादाने देशाची आणि महाराष्ट्राची फसवणूक केली असून देशात एक मोठं षडयंत्र रचण्याचा प्रयत्न गांधीवादी राजकारण्यांकडून करण्यात येत असल्याचा आरोप यावेळी सदावर्ते यांनी केला. "महात्मा गांधी यांनी श्वास सोडताना श्रीराम म्हटलं होतं असं सांगितंल जातं. परंतु, नथुराम गोडसेजी यांची कोर्टात ट्रायल झाली त्यावेळी गोडसेजी यांनी स्पष्ट केलं होतं की महात्मा गांधी यांनी श्वास सोडताना कधीही हे राम म्हंटलं नव्हतं." असं वक्तव्य गुणरत्न सदावर्ते यांनी केलं आहे.


सदावर्ते म्हणाले, "गेल्या 70 वर्षात कष्टकऱ्यांसाठी आणि कामगारांसाठी कोणतंही ठोस काम झालेलं नाही. त्यांना न्याय मिळला नाही, कर्मचाऱ्यांचा फक्त कार्यकर्ते म्हणून वापर करण्यात आला. परंतु, यापुढे आम्ही कष्टकऱ्यांसाठी लढू. त्यांना न्याय निळवून देवू. मातृभूमिसोबत प्रामाणिकपणा आणि मानवतावाद यातून कष्टकऱ्यांचा विकास ही आमची भूमिका आहे. राम जन्मभूमिचे आम्ही वकील होतो. न्यायालयात आम्ही याबाबत लढलो आहे. प्रभू रामचंद्रांचा आर्शीवाद घेऊन आम्ही या पुढे लढणार आहोत.  


दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांनी यापुढे कामगार राज्यातील प्रत्येक निवडणुकीत उतरेल असे संकेत दिले. " आगामी मुंबई महापालिका किंवा राज्यातील इतर कोणत्याही निवडणुकीत कामगार उतरेल. प्रत्येक वार्डात जावून कर्मचारी सरकारची पोलखोल करतील. " असा इशारा सदावर्ते यांनी यावेळी दिला. 


महत्वाच्या बातम्या


Gunaratna Sadavarte : एसटी कर्मचाऱ्यांसाठी गुणरत्न सदावर्ते पुन्हा मैदानात, 'एसटी कष्टकरी जनसंघ संघटने'ची स्थापना  


Gunaratna Sadavarte : सदावर्ते यांचं लक्ष्य आता 'एसटी बँक', निवडणुकीत पॅनेल उभं करत देणार राष्ट्रवादीला शह