Accident News : जालना-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर बस आणि इर्टिगा कारचा  भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. बदनापूर शहरापासून जवळच असलेल्या शेलगाव नजीक हा अपघात झाला आहे. या अपघातात 1  ठार तर 2 जण जखमी झाले आहेत. यापैकी एकजण गंभीर जखमी झाला आहे. दुसरीकडे आज मुंबई-गोवा महामार्गावर खेडमध्येही भीषण अपघात झाला आहे. यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. 

Continues below advertisement

सटी महामंडळाच्या बसचा आणि इर्टिगा कारची समोरासमोर धडक बसून अपघात 

जालना - छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील बदनापूर जवळील शेलगाव येथे एसटी महामंडळाच्या बसचा आणि इर्टिगा कारची समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातामध्ये एक जण ठार तर दोन जण जखमी झालेत. जखमी पैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. छत्रपती संभाजीनगर वरून जालनाकडे येणाऱ्या बसला संभाजीनगर कडे जाताना दुसऱ्याबाजूने कार वळवता या कारची धडक बसली. या धडकेत कार मधील एकाचा जागीच मृत्यू झाला तर इतर दोन जखमींना जालन्यातील खाजगी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. 

मुंबई गोवा महामार्गावर खेडमध्ये भीषण अपघात 

भरधाव कंटेनरने तीन गाड्यांना धडक दिल्याची घटना घडली आहे. दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. खेड मधील भोस्ते घाटाच्या पायथ्याशी हा अपघात झाला आहे. कंटेनर मुंबईच्या दिशेने जात असताना तीन गाड्यांवर आदळला. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. महामार्गावरील ड्रायव्हरजन न दिसल्यामुळे कंटेनर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला यामुळं अपघात झाला. खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

Continues below advertisement