औरंगजेबाचं गुणगान करणाऱ्या अबू आझमींना सत्र न्यायालयाचा दिलासा, 20000 रुपयांच्या बाँडवर अटकेपासून संरक्षण
Abu Azmi : औरंगजेबाचं गुणगान करणाऱ्या अबू आझमींना (Abu Azmi ) सत्र न्यायालयानं दिलासा दिला आहे. 20 हजार रुपयांच्या बाँडवर अटकेपासून संरक्षण दिलं आहे.

Abu Azmi : औरंगजेबाचं गुणगान करणाऱ्या अबू आझमींना (Abu Azmi ) सत्र न्यायालयानं दिलासा दिला आहे. 20 हजार रुपयांच्या बाँडवर अटकेपासून संरक्षण दिलं आहे. 12,13 आणि 15 मार्चला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश अबू आझमींना देण्यात आले आहेत. वादग्रस्त विधानासाठी मुंबई (Mumbai) दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात अबू आझमींनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. हा अर्ज कोर्टानं स्वीकारला आहे.
नेमकं काय म्हणाले होते अबू आझमी?
समाजवादी पार्टीचे नेते व मानखुर्द-शिवाजीनगरचे आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांनी मुघल शासक औरंगजेबाबत केलेल्या एका वक्तव्यानंतर त्यांच्या राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला. अबू आझमींनी म्हटलं होतं की, चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. औरंगजेबाने अनेक मंदिर बनवलेली आहेत. मी औरंगजेबाला क्रूर प्रशासक मानत नाही. तसेच छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील जी लढाई होती, ती लढाई राज्य कारभाराची होती. ती लढाई कुठेही हिंदू आणि मुस्लिम अशी नव्हती, असे त्यांनी म्हटले होते. यानंतर भाजप व शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी विधानसभेत अबू आझमींच्या वक्तव्यावरून गोंधळ घातला होता. राजकीय वर्तुळात अबू आझमींवर टीकेची झोड उठली होती. अबू आझमींनी माफी मागावी, अशी मागणी देखील केली जात होती. यानंतर आता अबू आझमी यांचे निलंबन करण्यात आले होते. विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत अबू आझमी हे निलंबित आमदार असणार आहेत. दरम्यान, मी कोणतही चुकीचं वक्तव्य केलं नसल्याचं अबू आझमी यांनी म्हटलं होतं.
मी कोणत्याही महापुरुषाबद्दल चुकीचे वक्तव्य केलेले नाही
मी कोणत्याही महापुरुषाबद्दल कोणतही चुकीचे वक्तव्य केलेले नाही. आम्ही जे काही भाषणं ऐकतो, त्यावरुन मी वक्तव्य केले. यावर वाद तयार करण्याची काय गरज आहे? भाजपचा ज्या मुद्द्यांवरून मतं मिळतात त्याच मुद्द्यांवर वाद निर्माण केले जातात. महापुरुषांचा अवमान करणाऱ्याला 10 वर्षांची शिक्षा द्या, तसा कायदा करा अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे या आधीच केली आहे. ज्याची सत्ता असते तो कसाही गुन्हा दाखल करु शकतो. आज त्यांची सत्ता आहे, त्यांनी खुशाल आपल्याला तुरुंगात घालावे. जे इतिहासात सत्य आहे ते बदलता येणार नाही, असे अबू आझमी यांनी म्हटले होते.
महत्वाच्या बातम्या:
























