एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 24 जुलै 2019 | बुधवार

1. पुणे-मुंबई रेल्वेमार्गावर दुरुस्तीसाठी मेगाब्लॉक, 26 जुलैपासून 9 ऑगस्टपर्यंत संध्याकाळी 6 ते सकाळी 8 वाजेपर्यंत वाहतूक बंद राहणार, डेक्कन, प्रगती एक्स्प्रेससह तब्बल 15 गाड्या पंधरा दिवसांसाठी रद्द 

2. मुंबईसह ठाण्यात मुसळधार पावसाने त्रेधातिरपीट, वसई-विरारमध्ये रस्ते-दुकानांमध्ये पाणी शिरलं, येत्या 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा, तर रत्नागिरीत मुरजोळेत भूस्खलन झाल्याने घरांना धोका 

3. विदर्भ, मराठवाड्यावर वरुणराजा रुसला, चंद्रपुरात पावसासाठी देवाला साकडं, जालन्यात 10 एकर कापसावर ट्रॅक्टर, तर उस्मानाबादेत सोयाबीनवर नांगर फिरवला 

4. विधानपरिषदेच्या आचारसंहितेमुळे मेगाभरती रखडण्याची शक्यता, नोकरभरतीच्या घोषणेनंतर चार महिने प्रक्रिया पुढे न सरकल्याने अनेकांची संधी हुकण्याची भीती 

5. बीटेक अभ्यासक्रमाची प्रवेश फी भरण्यासाठी पैसे नसल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या, सोलापुरातील घटनेने खळबळ 

6. कारगिल विजय दिनानिमित्त 26 जुलै रोजी राज्यभरातील सिनेमागृहात 'उरी'चा फ्री शो, राज्य शासनाचा निर्णय 

7. एसईबीसी कायद्यानुसार नव्या नियुक्त्यांसाठी आधीच्या तात्पुरत्या नियुक्त्या थेट रद्द करु नका, हायकोर्टाची राज्य सरकारला तंबी 

8. रस्ते अपघात रोखण्यासाठी केंद्राचे कडक पाऊल, वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास अधिक कठोर शिक्षेची तरतूद, मोटर वाहन कायद्यातील दुरुस्तीला संसदेत मंजुरी 

9. मॉब लिंचिंगविरोधात प्रतिभावंताचा आवाज, मोदींना पत्र लिहून हस्तक्षेप करण्याची विनंती, रामचंद्र गुहा, श्याम बेनेगलांसह दिग्गजांचा समावेश 

10. पाकिस्तानमध्ये 40 दहशतवादी संघटना सक्रिय, खुद्द पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांची कबुली, पाकिस्तानच्याच मदतीनं ओसामाचा खात्मा झाल्याचाही दावा 

*BLOG* : कृष्णा-भीमा स्थिरीकरणाचा खेळखंडोबा का झाला? उस्मानाबादचे माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील यांचा ब्लॉग 

*यूट्यूब* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*मेसेंजर* m.me/abpmajha

*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBRK