एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 08/08/2018


 

  1. मुंबईत भारत पेट्रोलियमच्या हायड्रो क्रॅकर युनिटमध्ये स्फोट, रिफायनरीत लागलेली 70 टक्के आग नियंत्रणात, 21 कर्मचारी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती https://goo.gl/7wRXif


 

  1. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज दुसरा दिवस, सरकारी कार्यालयात शुकशुकाट, कर्मचारी नसल्यानं ठाण्यातील रुग्णालयात महिलेला प्रसुतीसाठी दाखल करुन घेण्यास नकार https://goo.gl/Lz1T7x


 

  1. सिनेमा दाखवा, खाद्यपदार्थ विकू नका, मुंबई हायकोर्टानं मल्टिप्लेक्स मालकांचे कान उपटले, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण विधीमंडळात खोटं बोलल्याचा मनसेचा आरोप https://goo.gl/L51dER


 

  1. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा मोर्चाची पुन्हा बंदची हाक, उद्याच्या बंदमध्ये ठाणे-नवी मुंबईला वगळलं, अहिंसक आंदोलनाची ग्वाही, तर पुण्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना जिल्हाधिकाऱ्यांकडून सुट्टी https://goo.gl/oNXetH


 

  1. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करुणानिधींना निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय, चेन्नईतील मरिना बीचवरच अंत्यसंस्कार https://goo.gl/NUavM7


 

  1. राज्यसभेच्या उपसभापती निवडणुकीत राष्ट्रवादीकडून उमेदवार देण्यास नकार, यूपीएकडून काँग्रेसचे बी के हरिप्रसाद यांना उमेदवारी, उद्या निवडणूक https://goo.gl/Y6vEmN


 

  1. 2002 च्या घाटकोपर बॉम्बस्फोटातील फरार आरोपी औरंगाबादेतून अटकेत, गुजरात एटीएसची कारवाई, 16 वर्षांनंतर अब्दुल रहमान शेख ताब्यात https://goo.gl/XMhnfR


 

  1. मुंबईत तूर्तास रिक्षा-टॅक्सीची भाडेवाढ नाही, परिवहन मंत्र्याचा ग्राहकांना दिलासा https://goo.gl/UPH9pw


 

  1. हवामान विभागापेक्षा ज्योतिषांचा अंदाज चांगला, चुकलेल्या पावसाच्या अंदाजामुळे राजू शेट्टींचा संताप, मोदींचा एखादा दौरा रद्द करुन हवामान विभागाला चांगला सॅटेलाईट घेऊन द्या, सरकारला उपरोधिक सल्ला https://goo.gl/CCFmfP


 

  1. खासदार हिना गावितांवरील हल्ल्याप्रकरणी 20 ते 25 जणांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा, 16 जण पोलिसांना शरण https://goo.gl/MWF3V6


 

*माझा विशेष* : गणेशोत्सवाच्या मंडपांना नियमांचा काच, मात्र त्यामुळे बाप्पांना का जाच? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9 वाजता

*एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा* - https://www.youtube.com/abpmajhalive      

*एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा* - www.instagram.com/abpmajhatv        

*एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016* 

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*