एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 06 ऑक्टोबर 2018 | शनिवार

 

  1. पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक जाहीर, छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात 12 आणि 20 नोव्हेंबरला, मध्य प्रदेश आणि मिझोरममध्ये 28 नोव्हेंबरला, राजस्थान आणि तेलंगणात 7 डिसेंबरला मतदान, 11 डिसेंबरला मतमोजणी https://goo.gl/658uS8


 

  1. पाच रुपयांच्या दिलाशानंतर पुन्हा इंधन दरवाढ, आज पेट्रोल 18 पैसे तर डिझेल 29 पैशांनी महागलं, डिझेल चार रुपये स्वस्त होऊनही ग्राहकांना फायदा फक्त 70 पैशांचाच https://goo.gl/5qnfrD


 

  1. आगामी निवडणुकांसाठी राज्यात राजकीय घडामोडींना वेग, प्रकाश आंबेडकरांसोबतच्या बैठकीत राजू शेट्टींचा महाआघाडीचा नवा प्रस्ताव, मातोश्रीवर शिवसेनेची महत्त्वाची बैठक https://goo.gl/XQ7YYm


 

  1. पार्थच्या उमेदवारीवर शरद पवार अनुकूल नाहीत, अजित पवारांचं सूचक मौन, शरद पवारही निवडणूक लढवणार नाहीत, रायगडमधून भास्कर जाधवांसाठी सुनील तटकरेंची माघार https://goo.gl/zuwghC


 

  1. दापोलीतील कोकण कृषी विद्यापीठाची अपघातग्रस्त बस अंबेनळी घाटातून बाहेर काढली, अपघाताची तांत्रिक कारणं आणि स्टेअरिंगवरील बोटांचे ठसे यांचा पोलीस शोध घेणार https://goo.gl/c2ZxM5


 

  1. मंगळवेढ्यात सालगड्याच्या मुलाशी लग्न केल्याच्या रागातून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलीची हत्या, मामाच्या तक्रारीनंतर आरोपी वडील आणि सावत्र आईला बेड्या https://goo.gl/6PpZMa


 

  1. पुण्यात होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी अटकसत्र सुरु, होर्डिंग कापणाऱ्या दोघांना बेड्या https://goo.gl/ksxcZa


 

  1. कौटुंबीक वादातून कोल्हापुर जिल्ह्यात इचलकरंजीजवळील यड्रावमध्ये एकाच कुटुंबातील चौघांची हत्या, हल्लेखोर जावयाचा शोध सुरु https://goo.gl/wsW5Wx


 

  1. "जे खोटं आहे ते खोटंच आहे," अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या आरोपांवर नाना पाटेकरांचं स्पष्टीकरण, पत्रकार परिषद घेऊन सगळ्याची उत्तरं देणार https://goo.gl/nEkGvv


 

  1. वेस्ट इंडिजला तिसऱ्या दिवशीच गुंडाळलं, राजकोट कसोटीत भारताचा एक डाव आणि 272 धावांनी विजय, पृथ्वी शॉला पहिल्याच कसोटीत सामनावीराचा किताब https://goo.gl/cNqL4f


 

*मूड देशाचा* : मोदींची सेमीफायनल, आज रात्री 8 वाजता एबीपी माझावर

*माझा कट्टा* : भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याशी गप्पा, पाहा आज रात्री 9 वाजता एबीपी माझावर

*एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा* - https://www.youtube.com/abpmajhalive  

*एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा* -  https://www.instagram.com/abpmajhatv

*एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या* 9223 016 016

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*