एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 18/04/2017 1. अवघ्या तीन तासात उद्योगपती विजय मल्ल्यांना अटक आणि जामीन, प्रत्यार्पण प्रक्रियेवर आजपासून वेस्टमिन्स्टर कोर्टात सुनावणी, सीबीआयची टीमही रवाना होण्याची शक्यता https://goo.gl/ghVvvb 2. शेतकऱ्यांसाठी या वर्षातली सगळ्यात मोठी खुशखबर, सरासरीच्या 96 टक्के पावसाचा अंदाज, अल निनोच्या कचाट्यातून सुटका goo.gl/gQE1ZM 3. कांदा उत्पादकांना अनुदान देण्यास राज्य सरकारला अखेर मुहूर्त सापडला, राज्यातील 1 लाख 25 हजार कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फायदा https://goo.gl/PbXmyi 4. नवी मुंबईत कुटुंबाला मारहाण करणाऱ्या दोघांना पोलिसांनी झोडपलं, रस्त्यावर चोप देणारा व्हिडीओ व्हायरल goo.gl/W1A0lG 5. पुण्याच्या भाजप कार्यालयात तुंबळ हाणामारी, गणेश बिडकर आणि गणेश घोस यांचे कार्यकर्ते भिडले, स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरुन वाद goo.gl/SpEU7C 6. भंडाऱ्यात त्वचारोग तज्ज्ञाच्या आत्महत्येनं खळबळ, डॉ. प्रितिश भोयर यांनी सलाईनमधून विष घेतलं, पोटाच्या विकाराला कंटाळून आयुष्य संपवलं goo.gl/U7A9Mp 7. उत्तरप्रदेशात ट्रीपल तलाकची डोकं चक्रावणारी घटना, कोर्टातील सुनावणीवेळी तोंडी घटस्फोट देत पती फरार, महिलेची कोर्टात धाव https://goo.gl/uCVIii ‘पतीनं मनातच तलाक म्हटलं आणि मला सोडलं’, पुण्यातील महिलेची व्यथा https://goo.gl/HH7kRV 8. हुंडा घेणारे षंढ, हुंड्याची प्रथा हिंदू, मुस्लिम आणि भारतातील सर्वच समाजाला लागलेली कीड, असदुद्दीन ओवेसींचा घणाघात https://goo.gl/dH6Rvw 9. 'अजान जरुरी, लाऊडस्पीकर नाही', सोनू निगमच्या ट्वीटवर सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेलांचं वक्तव्य https://goo.gl/YwnfcN 10. राणी बागेत मुंबईच्या महापौरांचं वास्तव्य योग्य नाही, विश्वनाथ महाडेश्वरांचं महापालिका आयुक्तांना पत्र https://goo.gl/y7rBxV 11. मुंबईकरांना आकर्षित करण्यासाठी बेस्टचा नवीन लूक https://goo.gl/deOrHZ तर बेस्टच्या जुन्या एसी बसला भंगारातही भाव नाही https://goo.gl/5MlxzF 12. 'गृहखात्यासंदर्भात मी तसं काहीही वक्तव्य केलं नाही', ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंचं परभणीत घुमजाव https://goo.gl/hwQaAo 13. 'प्लास्टिक अंडी ही निव्वळ अफवा आहे. मात्र अफवेमुळे अंडी उत्पादकांचं मोठं नुकसान, नॅशनल एग कोऑर्डिनेशन कमिटीची माहिती https://goo.gl/gNQ1uF प्लास्टिकच्या अंड्यांच्या तपासणीत चुकीचं आढळलं नाही : महादेव जानकर https://goo.gl/uRdaW0 14. पुण्यातील बाणेर अपघातात लेकीनंतर आता उपचारादरम्यान आईचाही मृत्यू, बेजबाबदार महिला चालक अटकेत goo.gl/5WZPX1 15. 'धोनीला कुणासमोर स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाही', ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर शेन वॉर्नकडून धोनीची पाठराखण https://goo.gl/TYvPaq माझा विशेष : कर्जबुडव्या विजय मल्ल्याला भारतात आणणार कधी?, पाहा विशेष चर्चा आज रात्री 9.15 वाजता, एबीपी माझावर सहभाग : भाजप प्रवक्ते माधव भंडारी, विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम, माजी सचिव परराष्ट्र मंत्रालय सुधीर देवरे, राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक माझा स्पेशल: पुस्तकांचं गाव असलेल्या भिलारची कहाणी माझावर, महाप्रचंड ग्रंथालयामुळे महाबळेश्वरचं खोरं श्रीमंत झालं बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर- https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर