- पंतप्रधान नरेंद्र मोदींची शिवरायांशी तुलना करणाऱ्या जयभगवान गोयलविरोधात तक्रारींचा पाऊस, विविध ठिकाणी गुन्हे दाखल, तर 'आज के शिवाजी' पुस्तकावर गोयल ठाम, पुस्तकाशी काहीही संबंध नसल्याचं भाजपचं स्पष्टीकरण https://bit.ly/2sj63I7
- छत्रपतींच्या वारसदारांनी भाजप सदस्यत्वाचे राजीनामे द्यावेत, शिवसेना खासदार संजय राऊतांची मागणी https://bit.ly/2QQn461 तर भाषा जपून वापरण्याचा शिवेंद्रराजेंचाही संजय राऊत यांना इशारा https://bit.ly/37ZdzHm
- विद्यार्थ्यांचा वापर राजकीय विचार पसरवण्यासाठी नको, सीएएच्या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा निर्णय, शिक्षण विभागाची शाळांना नोटीस https://bit.ly/30nX7xW
- लहान मुलांसाठीचं वाडिया हॉस्पिटल कुठल्याही परिस्थितीत बंद होऊ देणार नाही, मनसेच्या शर्मिला ठाकरेंचं आश्वासन, बचावासाठी कर्मचाऱ्यांसह लाल बावटा कामगार संघटनेचं आंदोलन https://bit.ly/36MVkow
- मुंबईतील टॅक्सींवर प्रवाशांच्या सोयीकरता तीन रंगाचे दिवे, 1 फेब्रवारीपासून होणार अंमलबजावणी, परिवहन आयुक्तांची माहिती https://bit.ly/37Xq6Li
- पालघर स्फोट प्रकरणात तातडीने चौकशी करा, गृहराज्य मंत्री सतेज पाटलांचे आदेश, गुन्हा दाखल करण्याच्याही पोलिसांना सूचना https://bit.ly/2tUkuTs
- युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या कार्यकर्त्याच्या हत्येचं सीसीटीव्ही फुटेज समोर, धारधार शस्त्राने 20 वेळा भोसकलं तर नागपुरात गेल्या 12 दिवसांत 8 जणांची हत्या https://bit.ly/2TufDDt
- व्हीआयपी सुरक्षेतून NSG कमांडो पूर्णत: हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय, मुक्त झालेल्या 450 एनएसजी कमांडोंची नव्या ठिकाणी नियुक्ती https://bit.ly/2NmNZ7e
- दीपिका पदुकोणच्या जाहिराती दोन आठवड्यासाठी कंपन्यांनी थांबवल्या, दीपिकाच्या जेएनयू भेटीनंतर जाहिरात कंपन्यांचा निर्णय https://bit.ly/37115yI
- न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा; रोहित शर्मा, मोहम्मद शमीचं कमबॅक, येत्या 24 जानेवारीला पहिला सामना https://bit.ly/2RbVi2N
यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
हॅलो अॅप - http://m.helo-app.com/al/mUfSswxex
*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBRK