एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 24/01/2018


1. ‘पद्मावत’वरुन करणी सेनेचा धुमाकूळ, अहमदाबादेत चित्रपटगृहाबाहेर गाड्या पेटवल्या, तर मुंबईत करणी सेनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड, महाराष्ट्रात पाठिंब्यावरुन मनसेमध्ये मतमतांतरे https://goo.gl/Rnpuvd

2. भाजप विरोधातील संविधान बचाव रॅलीच्या सांगता कार्यक्रमाला परवानगी नाही, मुंबई पोर्ट ट्रस्टचा निर्णय, गेटवेवर आंदोलनाची सांगता http://abpmajha.abplive.in/live-tv

3. चारा घोटाळ्याच्या तिसऱ्या खटल्यात लालू यादवांना पाच वर्षांची शिक्षा, सीबीआयच्या विशेष न्यायालयाचा निर्णय, जगन्नाथ मिश्राही दोषी https://goo.gl/s2sgTp

4. 'शेळी, ससा नव्हे, तर शिवसेनेचा वाघ आता कासव झाला आहे', जालन्यात अजित पवारांची शिवसेनेवर टीका https://goo.gl/D6QBRU

5. 'शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याने ‘गले की हड्डी’ दूर झाली, आता भाजपने स्वतंत्र विदर्भाचा तातडीने निर्णय घ्यावा', भाजप आमदाराची मागणी https://goo.gl/WJWboz

6. मुंबई महापौरांच्या गाडीला किरकोळ अपघात, विश्वनाथ महाडेश्वर सुखरुप, स्कूटीचालक आणि महापौरांच्या गाडी चालकाची भररस्त्यात बाचाबाची https://goo.gl/sbfeCk

7. अंबाबाईच्या मंदिरात आजपासून प्लास्टिकबंदी, प्रदूषण थांबवण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा निर्णय, भाविकांकडूनही स्वागत https://goo.gl/tj3ybi

8. नागपूरकरांसाठी या वर्षातली मोठी खुशखबर, मेट्रो मार्चपासून प्रवाशांच्या सेवेत, वाहतूक कोंडीवर मोठा दिलासा http://abpmajha.abplive.in/live-tv

9. वीटभट्टीवर काम करणाऱ्या हातांना सरस्वती पावली, लातूरचा मोहसीन शेख आणि छोट्याश्या खोलीत राहणाऱ्या सांगलीच्या रेखा मगदूमचं सीए परीक्षेत उज्ज्वल यश https://goo.gl/viKbxh

10. सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या बंडानंतर आता दुसरा अंक सुरु, सरन्यायाधीशांविरोधात महाभियोग आणण्याची विरोधीपक्षांची तयारी https://goo.gl/eoDZ1w

11. नवीन वर्षात सोन्याचा उच्चांकी भाव, 20 दिवसात सातशे रुपयांनी दर वाढले, चांदीचे दरही गगनाला भिडले http://abpmajha.abplive.in/

12. ‘सारंगी महाजन यांना हवा असलेला वाटा दिल्याने महाजन कुटुंबीयांचा जमिनीचा वाद कोर्टाबाहेरच मिटला’, प्रकाश महाजन यांची माहिती https://goo.gl/7VksrD

13. ट्रेनसमोर सेल्फी काढण्याचं वेड महागात, सेल्फीच्या नादात हैदराबादमधील तरुणाला ट्रेनची धडक, अपघातात तरुण गंभीर जखमी http://abpmajha.abplive.in/

14. अमेरिकेचा पाकिस्तानवर हल्ला, उत्तर वझरिस्तानवर ड्रोननं कारवाई, ड्रोन हल्ल्यात हक्कानी संघटनेच्या म्होरक्यासह दोन जण ठार https://goo.gl/F2VchD

15. जोहान्सबर्ग कसोटीत झुंजार अर्धशतक झळकावून विराट कोहली माघारी; राहुल आणि विजयही स्वस्तात बाद https://goo.gl/dZLoNY

माझा विशेष : करणी सेना फोफावण्यामागे भाजप सरकार? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9.00 वाजता फक्त एबीपी माझावर

ब्लॉग : फूड ब्लॉगर अंबर कर्वे यांचा नवा ब्लॉग, खादाडखाऊ : पुण्यातील दोराबजी & सन्स https://goo.gl/FvnuEM

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive  

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा