एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 11/03/2018

  1. शेतकऱ्यांचा विराट मोर्चा मुंबईच्या वेशीवर असताना सरकारकडून चर्चेची ऑफर, गिरीश महाजन मोर्चेकऱ्यांच्या भेटीला, आंदोलक मात्र लेखी आश्वासनावर ठाम https://goo.gl/h9G7Gk

  2. काँग्रेस-राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसेसह अनेक संघटनांचा शेतकरी मोर्चाला पाठिंबा, नेतेमंडळीही मोर्चात सहभागी होणार https://goo.gl/h9G7Gk

  3. अकोला आणि यवतमाळमध्ये जोरदार पाऊस, पिकांचं मोठं नुकसान, उकाड्यापासून मात्र काहीसा दिलासा http://abpmajha.abplive.in/

  4. राज्यसभा निवडणुकीसाठी राज्यातील सहा जागांपैकी चार नावं जाहीर, एकनाथ खडसे राज्यसभेसाठी अनुत्सुक, सूत्रांची माहिती, काँग्रेस उमेदवाराबाबतही उत्सुकता https://goo.gl/BzEpgR

  5. पैशाच्या हव्यासातून चोरी, तरुणीविषयीच्या आकर्षणातून बलात्कार, अंबरनाथमधील तरुणाची हत्या आणि तरुणीवर बलात्कार प्रकरणी आरोपीला बेड्या https://goo.gl/kunHrj

  6. नागपुरात बिल्डरच्या पत्नीचा गळफास, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सहा फॅमिली फ्रेण्ड्सवर गुन्हा, काँग्रेस नगरसेवकाचाही समावेश https://goo.gl/Tu6zme

  7. रेल्वेचं कन्फर्म तिकीट असताना प्लॅन रद्द झाला तरीही चिंता नाही, आता इतरांच्या नावे तिकीट ट्रान्सफर करणं शक्य https://goo.gl/koJmny

  8. वडील राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना मी आणि बहीण प्रियांका गांधीने माफ केलंय, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचं भावूक वक्तव्य https://goo.gl/MXuwcd

  9. केंद्रात मोदी सरकार आल्यापासून देशात संघाचा विस्तार वाढला, नागपुरात आयोजित प्रतिनिधी सभेतील अहवालात दावा https://goo.gl/bCYywX

  10. भारत-फ्रान्समध्ये 14 महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षरी, संरक्षण, रेल्वे, ऊर्जा, स्मार्ट सिटीसारख्या अनेक करारांचा समावेश https://goo.gl/HvYWPS

  11. उत्तर प्रदेशातील झांसी मेडिकल कॉलेजमधील डॉक्टरांचा असंवेदनशीलतेचा कळस, रुग्णाला त्याचाच तुटलेला पाय उशी म्हणून दिला https://goo.gl/H91vYw

  12. स्वयंसेवी संस्थेच्या क्रेडिट कार्डवरुन शॉपिंग केल्याचा आरोप, मॉरिशसच्या पहिल्या महिला राष्ट्रपती पदावरुन पायउतार होणार https://goo.gl/DDo8Hv

  13. नवाझुद्दीन सिद्दीकीने पत्नीचे कॉल डिटेल रेकॉर्ड मागवून हेरगिरी केल्याचा आरोप, फेसबुक पोस्टद्वारे पत्नी आलियाने आरोप फेटाळले https://goo.gl/T8yig4

  14. IPL च्या धर्तीवर टी-20 मुंबई लीगला आजपासून सुरुवात, सहा संघांमध्ये टक्कर, सचिन तेंडुलकर ब्रँड अॅम्बेसेडर https://goo.gl/mdAkMt

  15. फोन हरवल्यापासून शमीचं वर्तन बदललं, पत्नी हसीन जहाचा आणखी एक आरोप, तर संवादातून वाद सोडवण्यासाठी तयार, शमीचं स्पष्टीकरण https://goo.gl/THnbRv


BLOG : सिनेसमीक्षक अमोल उदगीरकर यांच्या एका हरवलेल्या दशकाची डायरी सदरातील ब्लॉग-जसपाल भट्टी-सामान्य माणसाचा कलाकार मित्र https://goo.gl/o6J5WA

माझा विशेष : सरकार शेतकऱ्यांचा अंत पाहतंय? विशेष चर्चा, रात्री 8 वाजता, एबीपी माझावर

विशेष चर्चा : अन्नदात्याचा आक्रोश, मोर्चेकरी शेतकऱ्यांसोबत संवाद, रात्री 9 वाजता, एबीपी माझावर

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा