ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑक्टोबर 2025 | मंगळवार

1) वाशीत रहेजा रेसिडन्सी इमारतीला भीषण आग, सहा वर्षांच्या चिमुकलीसह चार जणांचा मृत्यू, ऐन दिवाळी सणात दु:खाचा डोंगर https://tinyurl.com/3x279993 नवी मुंबईतील कामोठेत सिलेंडरचा स्फोट, भीषण आगीत होरपळून माय-लेकीचा मृत्यू https://tinyurl.com/3v2w5js5 भाऊबीजेच्या तोंडावर भावा-बहिणीवर काळाचा घाला, आयशर टेम्पोच्या धडकेत कोल्हापुरात तिघांचा मृत्यू https://tinyurl.com/33cds67k

Continues below advertisement

2) मी जरी पक्ष सोडून गेलो तरी अजितदादांना काही फरक पडत नाही; नाराजांची समजूत काढणार, राष्ट्रवादीला लागलेल्या गळतीबाबत कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंचं वक्तव्य https://tinyurl.com/35bv9bbf मला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचा प्रस्ताव होता, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा गौप्यस्फोट, पण मी माझ्या पक्षात राहिल्यामुळं माझं भले झालं https://tinyurl.com/258xj52a राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; जळगावमधील चाळीसगावच्या राजकारणात मोठी पोकळी https://tinyurl.com/56xpvr7p

3) तोड्या करण्यासाठी दोन भाऊ एकत्र, ठाकरे परिवार हे मजबुरीचे नाव; नवनीत राणांची राज ठाकरेंसह उद्धव ठाकरेंवर टीका https://tinyurl.com/4bam7zzh मला व्यक्तीस्वातंत्र्य, मी माझं मत व्यक्त करु शकतो, इथे राजकारण आणण्याचा संबंध नाही, संजय राऊतांच्या टीकेला अभिनेते महेश कोठारेंचं प्रत्युत्तर https://tinyurl.com/3mjve49j 

Continues below advertisement

4) 2024 च्या विधानसभा निवडणुकीत रत्नागिरीतून ठाकरे गटाकडून लढलेले सुरेंद्र उर्फ बाळ माने भाजपच्या वाटेवर, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट https://tinyurl.com/4t3rh38h आम्ही रक्ताचं पाणी करुन या लोकांशी संघर्ष केला, आता हेच लोक आमच्या उरावर बसवणं चुकीचं; सोलापूरमध्ये दिलीप मानेंच्या प्रवेशाला भाजप कार्यकर्त्यांचा विरोध https://tinyurl.com/3as2hf84

5) फडणवीस साहेबांवर मराठ्यांचा विश्वास बसलाय, त्यांनी तो ढळू देऊ नये एवढीच अपेक्षा, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचं वक्तव्य https://tinyurl.com/3hmbjfym

6) पूर ओसरुन महिना झाला तरी घरात वीज नाही, शेतकऱ्यांनी जनरेटर भाड्याने आणून घरात कंदील लावले, खासदार ओमराजेंचा हल्लाबोल, म्हणाले, सरकारने जीआर काढून दिवाळीच पुढे ढकलावी https://tinyurl.com/bwmjp8hd महापुरात उद्ध्वस्त झालेल्या धारशिवच्या शेतकऱ्यांना 101 दुभत्या गायी देणार, मंत्री प्रताप सरनाईक यांची दिवाळी भेट https://tinyurl.com/4btdjh97 यंदा दिवाळी पावसातच जाणार! पुढील 4 दिवस राज्यभरात वादळी वाऱ्यासह पावसाचे इशारा, भारतीय हवामान विभागाचा अंदाज https://tinyurl.com/y3rfbh94

7) धर्मदाय आयुक्तांना स्थगिती देण्याचा अधिकार कोणी दिला? स्थगिती नाही व्यवहार रद्द करा..! पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्री प्रकरणावर पुन्हा माजी आमदार रविंद्र धंगेकर बरसले https://tinyurl.com/fsu6z57c ऐन दिवाळीत राजभवनात मोठी घडामोड! निशिकांत देशपांडे बनले राज्यपालांचे नवे प्रबंधक; अप्पर जिल्हाधिकारीपदी पदोन्नती https://tinyurl.com/ytj685uv 

8)  मुलीच्या छेडछाडीनंतर ठाण्यातील डाचकुल पाडा परिसरात दोन गटांमध्ये झटापट; 25 पेक्षा जास्त रिक्षांची  तोडफोड https://tinyurl.com/rc78tdct रायगडमध्ये फेसबुक मित्राने केला घात, शरीरसंबंध ठेवत विवाहितेला जाळ्यात अडकवलं, अडीच वर्षे दिल्या नरकयातना, आरोपीला अटक   https://tinyurl.com/3zp6bek4

9)  स्वप्निल जोशी, भाऊ कदम पहिल्यांदाच एकत्र; प्रेक्षकांची दिवाळी दणक्यात, 'प्रेमाची गोष्ट 2'मधून नवी केमिस्ट्री उलगडणार https://tinyurl.com/phvccy9f

10) आशिया कपची ट्रॉफी भारताला द्या, बीसीसीआयचा मोहसीन नक्वीला इशारा, मागणी मान्य न केल्यास पुढचं पाऊल टाकणार https://tinyurl.com/36djhhvc दक्षिण अफ्रिकेविरुद्ध भारत अ संघाची घोषणा, ऋषभ पंतची टीम इंडियात एन्ट्री, थेट कर्णधारपदी निवड तर साई सुदर्शन उपकर्णधार https://tinyurl.com/4mcr93kp

एबीपी माझा स्पेशल

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी महायुतीमध्ये धुसफूस; ठाणे, नवी मुंबईपासून सातारा, सांगली, रायगडपर्यंत...कोणत्या जिल्ह्यात काय परिस्थिती?, A टू Z माहिती https://tinyurl.com/2jwa7fer