ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2026 | रविवार

Continues below advertisement

1. एल निनोच्या परिणामाची दाहकता अजून वाढेल, फेब्रुवारीत तो तीव्र असेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य तर ट्रिगर-3 मध्ये गरजेनुसार उरलेले 5 ते 10 तालुकेही समाविष्ट करु, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन https://shorturl.at/kTfIC  दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी मांडल्या आदित्य ठाकरेंसमोर व्यथा, कर्जमाफी जाहीर झाली पण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलीच नाही, दुष्काळाचा जीआर निघाला प्रत्यक्ष मदत कधी, आदित्य ठाकरेंचा सरकारला सवाल https://shorturl.at/fO35S 

2. शेतकऱ्यांच्या मदतीच्या कामांना सर्वोच्च प्राधान्य, परवानगीशिवाय रजेवर जाणाऱ्यांवर थेट कारवाईचा बडगा; नागपूर जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकारी-कर्मचाऱ्यांना सक्त निर्देश https://shorturl.at/XREPj   डोळ्यादेखत डाळिंबाचं उभं पीक करपलं, शेत कोरडंठाक पडलं, सांगोल्यात दुष्काळाचे भीषण वास्तव, आता जगायचं कसं? सोलापुरातील सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांचा सवाल https://shorturl.at/MYEMC 

Continues below advertisement

3. निवडणूक आयोगातील संशयकल्लोळावर सर्व भाजपशासित मुख्यमंत्री मैदानात, हातात संविधान आणि डोक्यात डावी मानसिकता, निवडणूक आयोगावरील आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधीवर हल्लाबोल, मतचोरी नाही तर विरोधकांचा मेंदूच चोरीला गेल्याचा घणाघात  https://shorturl.at/4c0kO 

4. एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी धक्कादायक खुलासा, नुकतेच अटक करण्यात आलेले दोन्ही उमेदवार परीक्षेत टॉपर, आतापर्यंत 11 आरोपींना अटक https://tinyurl.com/53tf3xke 

5. जंगलातला नक्षलवाद संपला तरी राज्याच्या शहरी भागात छुप्या पद्धतीने कार्यरत, मुंबईसह राज्यातील शाळा आणि महाविद्यालयातून नक्षलवादी चळवळींचं जाळं, आत्मसर्पित नक्षली कमांडर अनिल रामास्वामी मेकला याचा स्फोटक कबूलनामा https://tinyurl.com/4x6ndjth 

6. धर्म असू दे, सण असू दे, हा घरापुरताच मर्यादित ठेवला पाहिजे, डीजेविरोधातील लढ्यात अभिनेता सुमित राघवनचे पुण्यात परखड वक्तव्य, विद्यानंद बापटांना दिला पाठिंबा https://tinyurl.com/4654pjc8 

7. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ भाजपकडेच राहणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरवतील तोच उमेदवार, मंत्री चंद्रकांत पाटील यांचं मोठं वक्तव्य https://tinyurl.com/mua4f5xt 

8. मुंबईतील राम मंदिर परिसरात रासायनिक वासामुळे दोघांचा गुदमरून मृत्यू, सार्वजनिक शौचालयाशेजारील कारखान्यातून वायूगळती, कारखाना मालकाला अटक https://tinyurl.com/muye6wwz  वेल्डिंगदरम्यान भीषण स्फोट, उपचारादरम्यान आणखी दोघांचा दुर्दैवी अंत; मृतांचा आकडा पोहचला चारवर; यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड हादरलं https://tinyurl.com/3ma5ejyk 

9. नऊ लाखांच्या कर्जापायी खासगी सावकाराला 26 लाख दिले, तरीही अजून 25 लाखांची मागणी, सावकाराच्या छळाला कंटाळून कोल्हापुरातील व्यक्तीने विष पिऊन जीवन संपवलं https://tinyurl.com/ye2ye4tu  'बिग बॉस' फेम दिव्या शिंदेला अटक! 5 लाखांची खंडणी, ज्येष्ठ डॉक्टरांच्या घरात घुसून मारहाण, नेमकं घडलंय काय? https://tinyurl.com/5n6rhnuw 

10. भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये तिरुवनंतरपुरममध्ये पहिला एकदिवसीय सामना, भारतासमोर विजयासाठी 296 धावांचं आव्हान, कुलदीप यादवचे चार बळी https://tinyurl.com/5n8te62f  तिरुवनंतपुरममध्ये कॅरिबियन वादळ, 24 वर्षांनंतर भारताविरुद्ध वेस्ट इंडिजची 135 धावांची सलामी भागीदारी https://tinyurl.com/2x3ux5e4 

एबीपी माझा स्पेशल

छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन https://tinyurl.com/5daaw5js 

SIR विरोधात देशव्यापी रान उठलं, गल्ली ते दिल्ली ते सुप्रीम कोर्टापर्यंत ज्ञानेश कुमारांविरोधात संतापाचा उद्रेक अन् निवडणूक आयोगाच्या एकाच बैठकीत 9 निर्णय! किती परिणाम होणार? https://tinyurl.com/ycphpnea 

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w