ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 मार्च 2026 | मंगळवार

Continues below advertisement

1. महसूल खात्यातला आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा समोर, महसूल अधिकाऱ्यांनी केली एक ते दीड लाख शेतकऱ्यांची फसवणूक, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची विधान परिषदेत कबुली, कारवाईचं दिलं आश्वासन https://tinyurl.com/5d72ncvw  दीड लाख शेतकऱ्यांचे उतारे कसे बदलले, राज्यातील सर्वात मोठा महसूल घोटाळा कसा समोर आला? इनसाईड स्टोरी https://tinyurl.com/y47vy7d2 

2. नाशिकच्या 'कॅप्टन' मांत्रिकाला अटक, भोंदूबाबा अशोक खरातवर गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप, 58 अश्लील व्हिडीओ पोलिसांच्या हाती https://tinyurl.com/4vaeju3w  मर्चंट नेव्हीचा माजी अधिकारी ते कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट, एकनाथ शिंदे, चाकणकर, विखे-पाटलांसारखे हायप्रोफाईल क्लाएंट, महिलेने नको ते आरोप केल्यानंतर चर्चेत आलेला अशोक खरात कोण? https://tinyurl.com/4p2v7tjw 

Continues below advertisement

3. धार्मिक विधीच्या नावाखाली ऑफिसमध्ये महिलेसोबत अश्लील चाळे, भोंदूबाबा अशोक खरातचा आणखी एक व्हिडीओ समोर https://tinyurl.com/3dyheuxx  महिलेवर लैंगिक अत्याचाराचा आरोप असलेल्या अशोक खरातची पाद्यपूजा केल्याचा रुपाली चाकणकरांचा फोटो व्हायरल, तर खरातांवरील आरोपांबाबत मला काही कल्पना नव्हती, रुपाली चाकणकरांची पहिली प्रतिक्रिया https://tinyurl.com/ythz4aa6 

4. एकनाथ शिंदेंपाठोपाठ फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यामुळे पुन्हा 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा, ठाकरेंच्या खासदारांशी शिवसेनेच्या नेत्यांनी संपर्क केल्याची सूत्रांची माहिती https://tinyurl.com/3k5ez24v  शिंदे-अजित पवार गट भाजपची अंगवस्त्र, मोदी-शाहांनी या लोकांची मांजरं केली, ऑपरेशन करणारे इथंच निर्वस्त्र होऊन आपापल्या राज्यात परत गेले, खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल https://tinyurl.com/nhe3x3tt 

5. सांगलीत महाविकास आघाडीकडून महायुतीचा करेक्ट कार्यक्रम, झेडपीच्या अध्यक्षपदी शरद पवारांच्या पक्षाच्या संगिता पाटील, तर उपाध्यक्षपदी काँग्रेसच्या विश्वजित कदमांचे भाचे ऋषिकेश लाड यांची वर्णी  https://tinyurl.com/yaj6dtn5  छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचा, ठाकरेसेनेने तटस्थ राहून भाजपला अप्रत्यक्ष मदत केल्याची चर्चा https://tinyurl.com/amcx2bxn 

6. बारामतीत राष्ट्रवादी उमेदवार देणार नसेल तर सुनेत्रा पवारांविरुद्ध काँग्रेस उमेदवार देईल, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचं मोठं वक्तव्य https://tinyurl.com/yunv8pys 

7. संसदेत कसं वागायचं हे नवीन खासदारांनी देवेगौडा, मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवारांकडून शिकले पाहिजे, पीएम मोदींचे राज्यसभेत निवृत्त होणाऱ्या खासदारांना निरोपाचे भाषण https://tinyurl.com/hm3fpvzv 

8. प्रेयसीच्या आई-वडिलांकडून त्रास, नोकरी घालवण्याची धमकी, कंटाळून मुंबई पोलिसातील तरुण पोलीस शिपायाने प्रशिक्षण केंद्रातच गळ्याला लावला दोर https://tinyurl.com/ysyzjfy2  शाळेतून घरी जात असताना सहावीतील विद्यार्थीनीवर ॲसिड हल्ला, अहिल्यानगरमधील संगमनेर हादरले https://tinyurl.com/5av2sz4u 

9. पुढील दोन दिवस राज्यात वादळी पावसासह गारपिटीचा इशारा, विदर्भ-मराठवाड्यावर अवकाळीचे सावट, हवामान विभागाचा अंदाज, मुंबईसह काही जिल्ह्यांना अलर्ट https://tinyurl.com/5cvyuh43 

10. आयपीएल आधी मोठी घडामोड, महेंद्रसिंह धोनीने 7 नंबरची जर्सी सोडली, 8 नंबरची जर्सी परिधान करून मैदानात उतरणार https://tinyurl.com/5t3cyb4k  लिलावाचा 40 टक्के पैसा फक्त 5 खेळाडूंवर खर्च, IPL 2026 मधील सर्वात महागड्या खेळाडूंची यादी वाचा https://tinyurl.com/mr47ezuu 

एबीपी माझा स्पेशल

गाड्या घेणं महागणार, पर्यावरण कर दुपटीने वाढवला, महाराष्ट्र मोटार वाहन कर सुधारणा विधेयक एकमताने मंजूर https://tinyurl.com/2er4htdx 

एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w