ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 फेब्रुवारी 2025 | शनिवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 फेब्रुवारी 2025 | शनिवार
1.मुंबईतील मुलुंडमध्ये एलबीएस मार्गावर मेट्रोच्या बांधकामाचा स्लॅब कोसळला, एकाचा मृत्यू, तीन जखमी, तर दोषींवर योग्य ती कारवाई करणार, महापौर रितू तावडेंची ग्वाही https://tinyurl.com/3nb2pf36 उत्तर प्रदेशातील सरपंच नातेवाईकाच्या लग्नासाठी मुंबईत आले, अन् मेट्रो पिलरचा सिमेंट ब्लॉक कोसळून घात झाला, दुर्दैवी घटनेनं हळहळ https://tinyurl.com/ya5rnmm3 मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? ‘सो कॉल्ड Infra Man’ फडणवीस निर्माणाधीन बांधकाम कोसळल्याची जबाबदारी घेतील का? काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल; आदित्य ठाकरेंचाही सडकून प्रहार https://tinyurl.com/7fs84xph
2. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची अलिबागमध्ये मालकाच्या मर्जीविरोधात जमिनीची मोजणी, संजय राऊतांकडून व्हिडीओ पोस्ट करत आरोप https://tinyurl.com/s28h36ta म्हात्रोळीतील जमीन गुजराती उद्योगपतीच्या घशात घालण्यासाठी राहुल नार्वेकर तिकडे गेले होते, संजय राऊतांचा आरोप https://tinyurl.com/54savxfm शेतकऱ्यांचं भांडण सोडवण्यासाठी गेलो होतो, त्यावेळी कुणीतरी शूट केलं, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/2ueb549h
3. टिपू सुलतान हे शिवाजी महाराजांच्या समकक्ष योद्धे होते, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याने वादाचा भडका https://tinyurl.com/mrupdu2e उपमहापौरांच्या दालनात झळकला टिपू सुलतानचा फोटो, शिवसेना-हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यानंतर फोटो हटवला, मालेगावात राजकारण तापलं https://tinyurl.com/32t2wbje
4. मंत्रालयातील लाचखोरी प्रकरणानंतर नरहरी झिरवळ नॉट रिचेबल असल्याच्या चर्चांना उधाण, आदिवासी संमेलनाला गेलेच नाहीत, तर झिरवाळ उद्या किंवा परवा मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती https://tinyurl.com/t6uk52pz
5. अजित पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे अमित शाहांच्या हातात, शाह सांगतात तेच प्रफुल पटेल बोलतात, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण होणार नाही, संजय राऊतांचा दावा https://tinyurl.com/2zwk2h73 विलिनीकरणाची ऐवढी घाई कशाला? सुनेत्रा पवार आमच्या कॅप्टन, त्या योग्य निर्णय घेतील, छगन भुजबळांचं विलिनीकरणाच्या चर्चांवर वक्तव्य https://tinyurl.com/mshfatjd
6. नवी मुंबईकरांसाठी काही करत नसाल तर तुमचे नगरविकास मंत्रिपद चाटायचे का? सिडकोचा भूखंड बिल्डरांच्या घशात घातल्याचा आऱोप करत गणेश नाईकांची एकनाथ शिंदेंवर टीका. तर तेव्हाच भूमिका का घेतली नाही, शिवसेनेचा पलटवार https://tinyurl.com/bd5krufk
7. भिवंडीत महापौर निवडीच्या तोंडावर मोठी घडामोड, कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील यांना अटक, कोणार्क विकास आघाडीचे पाच नगरसेवक https://tinyurl.com/2s4y78xz
8. धावत्या बसमध्ये बस चालकांचं ऑन ड्युटी मद्यप्राशन, बुलढाण्यातील खामगाग बस स्थानकात राडा, प्रवाशांना दोन तास धरलं वेठीस, परतवाडा-पुणे बस मधील प्रकार https://tinyurl.com/y7szkkxd
9. पतीला मृत्यूच्या दाढेतून खेचून बाहेर काढलं, पण विजेच्या धक्क्याने पत्नीचा दुर्दैवी अंत; नाशिकमधील हृदयद्रावक घटना https://tinyurl.com/t2mjj9wc गोंदियातील वृद्ध जोडप्याच्या प्रेमकहाणीचा डोळे पाणावणारा शेवट, पतीच्या निधनानंतर पत्नीनेही प्राण सोडले https://tinyurl.com/ykpfuc9y
10. शाब्दिक लढाई संपली, आता भारत-पाकिस्तान एकमेकांना भिडणार, आयसीसी टी-20 विश्वचषक सामन्यात रविवारी सायंकाळी भारत-पाकिस्तामध्ये हायहोल्टेज सामना https://tinyurl.com/549ayc28 पाऊस ठरतोय व्हिलन, सामना रद्द झाला तर पाकिस्तानची चांदी, पाहा पॉइंट्स टेबलचं गणित https://tinyurl.com/4mtkpnnx
एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w
























