ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार

Continues below advertisement

1. देशात जातनिहाय जनगणना होणार असल्याचं स्पष्ट, जात, धर्म, बँक खातं ते कोरोना लस कुठे घेतली अशा नागरिकांना विचारायच्या 40 प्रश्नांची यादी केंद्र सरकराकडून जाहीर https://tinyurl.com/tbzw72uz 

2. औद्योगिक महाराष्ट्राचा यशवंतरावांचा वारसा टिकवा, चाकणमध्ये कंपन्या बंद पडल्यावरून शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला, तर बंद झालेल्या 76 टक्के कंपन्या या डिसफंक्शनल, त्या कधीच सुरू झाल्या नाहीत, शरद पवारांना उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी आकडेवारीच मांडली https://tinyurl.com/2tmvjkke  हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो, आमदार रोहित पवारांचे उद्योगमंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज https://tinyurl.com/ybbnrktx 

Continues below advertisement

3. शरद पवारांकडून चुकीच्या पद्धतीनं राष्ट्रवादी काढून घेत निवडणूक आयोगानं अत्याचार केला, शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल https://tinyurl.com/mrct82h2  केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? पृथ्वीराज चव्हाणांचा प्रश्न, तर अमित शाह हे नालायक गृहमंत्री असल्याची टीका https://tinyurl.com/2tbmmdz3 

4. हा माझा आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विद्यार्थी विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून फटकार https://tinyurl.com/msmw4mws  सीजेपीचा आणखी एक विजय, हैदराबादेत सरन्यायाधीशांच्या कार्यक्रमास विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांची वकिली रोखण्याचा बार कौन्सिलचा निर्णय रद्द https://tinyurl.com/y3aymbf9 

5. पावसाचं पुन्हा कमबॅक, राज्यातील 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, पुढील दोन आठवडे कोकणात पावसाच्या सरी कोसळणार https://tinyurl.com/3me5pfff 

6. लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही, राज्यातील एक कोटी बहिणींना लखपती दीदी करणार , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन https://tinyurl.com/yefe5k7t 

7. विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात भोंदूबाबाचा धुमाकूळ, भोंदू उमेश तागुंदेचे पाय धुतलेलं दूध आणि पाणी पितानाचे भक्तांचे व्हिडीओ व्हायरल, तर भक्तांची कृती स्वत:हून, तागुंदेंचा दावा https://tinyurl.com/4v2jdt9y  मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, दैवी शक्ती प्राप्त असल्याचा दावा करणाऱ्या पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप https://tinyurl.com/bdcw8mme 

8. पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आले, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत https://tinyurl.com/f3bvdv9n  रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली, 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी https://tinyurl.com/yz9r957x 

9. अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज, पर्यावरण तज्ज्ञ सोनम वांगचूक यांचं वक्तव्य https://tinyurl.com/ca4nzh47  10. भारत-श्रीलंकेमध्ये शनिवारी पहिली कसोटी, टीव्ही की मोबाईल LIVE थरार कुठे पाहायचा? जाणून घ्या A टू Z https://tinyurl.com/2wyzbnvw  कांगारूंना बांग्लादेशने त्यांच्याच मातीत घामटा काढला, पहिल्या कसोटीत 153 धावांची आघाडी, तंजीद हसनचे शतक https://tinyurl.com/msna8afs 

एबीपी माझा स्पेशल

मयत शेतकऱ्यांच्या नावावरील कर्जमाफी त्याच्या वारसांना कशी मिळेल? A to Z माहिती https://tinyurl.com/2sa4r2tx 

मेलोनींवर कमेंट, राहुल गांधींवर फौजदारी गुन्हा दाखल होणार? परदेशी पंतप्रधान खटला भरू शकतो का? काय आहे नियम? https://tinyurl.com/mvhpzfr