ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 फेब्रुवारी 2025 | बुधवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 फेब्रुवारी 2025 | बुधवार
1.भारत अमेरिका व्यापार करारावरुन राहुल गांधींची पंतप्रधान मोदींसह सरकारवर कडाडून टीका, तुम्ही देशाला विकलं, तुम्हाला लाज वाटत नाही? राहुल गांधींचा लोकसभेत सरकारला तिखट सवाल https://tinyurl.com/7u78cuvu एपस्टीन फाईलवरुन राहुल गांधींची उद्योगपती अनिल अंबानी आणि केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांच्यावर निशाणा https://tinyurl.com/3ffa2njh
2. अजित दादांच्या अपघातावरुन रोहित पवारांचा नव्या आरोपांचा बॉम्ब, अजित पवारांचा मृतदेह विचित्रपणे सुजल्याचा दावा, अपघाताची चौकशी सीबीआयकडे देण्याचीही मागणी https://tinyurl.com/3kt8uy5j राजकारण कोणत्याही थराला जाऊ शकतं, सत्य कोण लपवतंय हे बाहेर आलं तर अनेकजण अडचणीत येतील, अजित पवारांचा घातपात झाल्याचा क्रू मेंबर पिंकी मालीच्या वडिलांचा संशय, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी https://tinyurl.com/2vyfzwr2
3. अजितदादांची विमान दुर्घटना कट होता का? रोहित पवारांचा गंभीर संशय, डिस्ट्रेस कॉल नाही, विमानात ट्रान्सपाँडर बंद, नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेत रोहित पवारांचे अनेक प्रश्न https://tinyurl.com/5ffmj2vb अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी होईपर्यंत वाट पाहा, कुणाच्या मनात शंका असेल तर निरसन व्हायला हवं, रोहित पवारांच्या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं उत्तर https://tinyurl.com/44w7wpbv
4. मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडे यांची बिनविरोध निवड, तर उपमहापौरपदी शिवसेनेचे संजय घाडी विराजमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात उपस्थित https://tinyurl.com/4tebsdkc मुंबई महापालिकेत पहिल्या दिवशी राडा, खाली बसावं लागल्याने काँग्रेसच्या महिला नगरसेवकांचा संताप, तर ठाकरेंच्या नगरसवेकांनी उपमहापौरांच्या भाषणाची प्रत फाडून टाकली https://tinyurl.com/wdpsk5mp
5. जमीन महसूल कायद्यात मोठा बदल, आता जमिनीसाठी एनए परवानगीची गरज नाही, जमिनीच्या अकृषक वापरासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र परवानगीची गरज नाही, महसूल विभागाचा मोठा निर्णय https://tinyurl.com/3cp6kufe
6. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतली पंतप्रधान मोदी, अमित शाहांची भेट, एनडीएमधील घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादीसोबत असल्याची मोदींची ग्वाही https://tinyurl.com/3xb424ck
7. चंद्रपूरला सर्वाधिक 27 नगरसेवक निवडून आणूनही सत्ता आणता आली नाही याची काँग्रेसला लाज वाटली पाहिजे, भाजपला पाठिंबा देण्यावरून संजय राऊतांनी फोडलं काँग्रेसवर खापर https://tinyurl.com/hcx87kec काँग्रेसशी बोलणी फिस्कटल्याने ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप गिर्हे तडक बाहेर पडले, भाजपने कारमध्येच करारनामा अन् सह्या केल्या, भाजपच्या चंद्रपूर विजयाची इनसाईड स्टोरी https://tinyurl.com/uu3f53dh
8. पुण्यात भाजपचं कठोर पाऊल, महापालिकेत बंडखोरी केलेल्या 69 जणांचं सहा वर्षांसाठी निलंबन, अमोल बालवडकरांसह बड्या नेत्यांचा समावेश https://tinyurl.com/2dmhnbwc
9. पोलीस होण्यासाठी धावत राहिला, पण स्वप्नांची शर्यत अर्धवट संपली, पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणाचा मैदानावरच अखेरचा श्वास, बीडमधील घटनेने हळहळ https://tinyurl.com/39wj96cc
10. मुंबईच्या गोवंडीमध्ये भरदिवसा 19 वर्षीय तरुणीवर गोळीबार अन् हत्या, प्रेमाच्या त्रिकोणातून हत्या झाल्याचा पोलिसांना संशय https://tinyurl.com/2s4hhauz नागपुरात 15 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत सामूहिक बलात्काराची घटना, दोन अल्पवयीन मुलासह ओळखीच्या तरुणाचं कृत्य https://tinyurl.com/ytbw6m2e
एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w
























