ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार

Continues below advertisement

1. संसदेचं कामकाज सुरळीत चालल्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बोलणार, सूत्रांची माहिती, जंतर मंतरवरील लाठीचार्जवरुन विरोधकांची निवेदनाची मागणी https://tinyurl.com/mte5h996  आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील, संजय राऊतांचा मोदी-शाहांवर हल्लाबोल https://tinyurl.com/36f7hvs5 

2. अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळेंनी राष्ट्रवादीच्या खासदारांसह पंतप्रधान मोदींची भेट घेतली, सुमारे अर्धा तास चर्चा https://tinyurl.com/3j8xderv  मराठवाडा आणि सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी, पंतप्रधानांच्या भेटीत बीडचे खासदार बजरंग सोनवणेंच्या मागण्या https://tinyurl.com/3edm6tbz 

Continues below advertisement

3. झारखंडमध्ये पेपरफुटीविरोधात विद्यार्थी आक्रमक, विधानसभेला घेराव घालण्यासाठी पोहोचलेल्या विद्यार्थ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रूधुराच्या नकळांड्याही फोडल्या https://tinyurl.com/2sy2kjc5 

4. कुणबी प्रमाणपत्रं रद्द करून एकनाथ शिंदेंची मराठ्यांमधील क्रेझ कमी करण्याचा डाव, मनोज जरांगे यांची शंका, चंद्रशेखर बावनकुळेंवर निशाणा  https://tinyurl.com/mdktf272  मनोज जरांगेंचे आरोप तथ्यहीन, बावनकुळेंनी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या सूचना दिल्याच नाहीत; बीडच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण https://tinyurl.com/ye2y24zx 

5. पुण्यातील चाकणच्या खड्ड्यांमुळे एमआयडीसीतील कंपन्या हैराण, तब्बल 20 कंपन्यांना टाळे लागण्याची शक्यता, 1000 कोटींचा फटका, 4000 कर्मचारी बेरोजगार होण्याच्या मार्गावर https://tinyurl.com/mrxv8tzw 

6. राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढण्याची शक्यता, पुढील दोन दिवस मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पावसाच्या सरी कोसळणार https://tinyurl.com/mpmkrk4n 

7. गाढ झोपेत असलेल्या तीन विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू, गडचिरोलीतील आश्रम शाळेतील धक्कादायक घटना https://tinyurl.com/2y938yc3 नाशिकमध्ये पुन्हा पर्यटकांवर हल्ला, हरिहर किल्ल्यावरून परतणाऱ्या गाडीचा पाठलाग करत तोडफोड, 10 जणांविरोधात गुन्हा https://tinyurl.com/522u39fn 

8. रुग्णवाहिकेसाठी सात वेळा फोन, दोन तास वाट पाहिली, तरी आलीच नाही, परभणीमध्ये गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, पाच जणांविरुद्ध गुन्हा https://tinyurl.com/bdda2a7j 

9. राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी https://tinyurl.com/msvjd2j4 

10. ग्लास्गो कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताची 39 पदकांची कमाई, मात्र सर्वाधिक 426 कोटींचा निधी दिलेल्या गुजरातमधून एकही पदक नाही, कमी निधी मिळालेल्या महाराष्ट्र, हरियाणा, मणिपूरच्या खेळाडूंचा डंका https://tinyurl.com/h8vzepnp 

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w