ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑगस्ट 2026 | शनिवार
1) सर्वोच्च न्यायालय धनुष्यबाण आपल्याला देईल नाहीतर चिन्ह गोठवेल, शिवसेना ठाकरे गटाच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं महत्त्वाचं भाष्य https://tinyurl.com/ywzmraz4 कार्यकर्ते टिकवण्यासाठी आणि पक्ष वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे खोटं बोलातायेत, शिवसेना शिंदे गटाचा हल्लाबोल https://tinyurl.com/4z7pnmyu
2) जंतर मंतरवर जे झालं ते देश आणि जगानं पाहिलं, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य https://tinyurl.com/mz86b5hd भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या त्यांच्या वाट्याला आल्या, मनसे प्रमुख राज ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले तरुणांना लाठ्या काठ्या मारण्याचे आदेश देणारे कधी माफी मागणार? https://tinyurl.com/b26h8cdb या देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री हे मनाने आणि विचाराने भरकटलेले, त्यांना मानसोपचारतज्ज्ञाची गरज, खासदार संजय राऊतांचा निशाणा https://tinyurl.com/muk8t6eb
3) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान, शाहंकडून डोवाल यांच्या कार्याचा गौरव, पहिल्या भेटीचाही सांगितला किस्सा https://tinyurl.com/5hu7bkux स्वातंत्र्य म्हणजे केवळ मनात येईल ते करणे नव्हे, तरुण पिढीला उद्देशून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचं वक्तव्य, म्हणाले युवकांनी देश घडवण्यासाठी योगदान द्यावं https://tinyurl.com/mppnx66y एका धुरंधरला पुरस्कार द्यायला दुसरे धुरंधर पुण्यात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून अमित शाह-अजित डोवालांचं कौतुक https://tinyurl.com/mrdfkzrb राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कौतुकाचा वर्षाव https://tinyurl.com/yc24n5az
4) मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचेत, हा कसला उच्च तंत्रशिक्षण मंत्री? मनसे प्रमुख राज ठाकरेंचा हल्लाबोल https://tinyurl.com/3ak2nvhy राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत, ठाकरेंच्या टीकेला मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटमांचं प्रत्युत्तर https://tinyurl.com/525rwnz6
5) पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिवीगाळ केल्यामुळे गुन्हा दाखल करत असाल, तर भाजपच्या त्या आयटी सेलवर गुन्हे कधी दाखल होणार? सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपकेंचा सवाल https://tinyurl.com/3uywt9pc दिल्ली पोलिसांच्या नावाने खोटा व्हिडिओ प्रसारित करणं काँग्रेस नेते भाई जगतापांना भोवलं; भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल https://tinyurl.com/uxjw9szu
6) आई-वडील शेतातील कामात व्यस्त; आंघोळीसाठी नदीवर गेलेल्या तीन चिमुकल्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू, गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्यात हृदय पिळवटून टाकणारी घटना https://tinyurl.com/4hhnwwkt पाच तास झाडावर जीव मुठीत धरून बसले; नाग झाडावर चढताच फांद्या तोडून खाली फेकले; जळगावात पुरात अडकलेल्या नागरिकाने सांगितला थरारक अनुभव https://tinyurl.com/55299ke5
7) किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी https://tinyurl.com/c3fdsk76 नाशकात पावसाचा हाहाकार! धारणांसह नदीपातळीत मोठी वाढ, हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर https://tinyurl.com/5443vv5a
8) जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवादी हल्ला, नाव विचारून छत्तीसगडच्या दोन मजुरांना संपवलं; 'लष्कर-ए-तैयबा'ने स्वीकारली भ्याड हल्ल्याची जबाबदारी https://tinyurl.com/mty8569m चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून संपवलं; नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा, दीड वर्षात सुनावणी पूर्ण, सांगली जिल्ह्यातील घटना https://tinyurl.com/5yudvss4 तब्ब्ल 45 लाखांची लाच स्वीकारताना ACB च्या जाळ्यात अडकला; नांदेडच्या MPSC टॉपर अन् क्लास 1 अधिकाऱ्याला अटक https://tinyurl.com/4c63mtut
9) असं सोडून जायचं नव्हतं...वडिलांच्या निधनानंतर सैराट फेम अभिनेता अरबाज शेखची पोस्ट; चाहतेही गेले गलबलून https://tinyurl.com/mrxndbdt हा अहंकार सोडा, PR कमी करा, फालतू रील्स बनवणं बंद करा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिडिओवर गायक विशाल ददलानीची टीका https://tinyurl.com/2whvd96p मोदींचं कौतुक करणारे अभिनेते विवेक ओबेरॉय, आर. माधवन दुबईला का शिफ्ट झाले? राज ठाकरेंचे खडे सवाल https://tinyurl.com/2b5rvkdb
10) टीम इंडियाच्या वेळापत्रकात अचानक मोठा बदल; श्रीलंका दौऱ्यावर सराव सामना आता 3 दिवसांचाच, जाणून घ्या नेमकं काय घडलं? https://tinyurl.com/4y78zdx7 ना दया, ना क्षमा, एशियन लेजेंड्स लीगमध्ये उद्या भारत-पाकिस्तान पुन्हा आमने-सामने https://tinyurl.com/u963kk9h
एबीपी माझा Whatsapp Channel
-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658