ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 ऑगस्ट 2025 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 ऑगस्ट 2025 | सोमवार
1. नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह राज्यातील स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश; प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळल्या https://tinyurl.com/48djbv6c सर्वोच्च न्यायालयाने 2022 प्रमाणे नाही तर 2017 प्रमाणेच निवडणूक होतील असे सांगितले, त्यामुळे राज्य सरकारच्या दोन्ही मागण्या मान्य केल्या आहेत; देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/5b7vfrce
2. मुंबईत आपला पक्ष सर्वाधिक बलवान; महापालिकेत सत्ता आपलीच येणार, हे टाळ्या मिळवण्यासाठी मी बोलत नाही; राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले https://tinyurl.com/4s9dtawv वीस वर्षांनी जर आम्ही दोन भाऊ एकत्र येऊ शकतो, तर मग तुम्ही एकमेकांमध्ये वाद का घालता? राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना 'मनसे' कानमंत्र! https://tinyurl.com/3b6h7u55 मराठी भाषेबाबत जर कोणी उर्मटपणे बोलले, तर मग त्यानुसारच पुढची भूमिका घ्या, व्हिडिओ काढू नका, राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश https://tinyurl.com/2k5zysm6
3. भाषिक द्वेष पसरवल्याचा आरोप करत राज ठाकरेंविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली, सुप्रीम कोर्ट म्हणाले, “उच्च न्यायालय सुट्टीवर आहे का ?” https://tinyurl.com/mr493yur चीनने 2000 किमी जमिनीवर कब्जा केला हे तुम्हाला कसं समजलं? सीमेवर तणावाची परिस्थिती असते तेव्हा कोणताही खरा भारतीय असे बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले https://tinyurl.com/mt5ub3xm
4. मंत्रिपद जाऊन 4 महिने उलटले, धनंजय मुंडेंना सरकारी बंगला सोडवेना; 42 लाखांचा दंड भरवा लागणार, छगन भुजबळ गृहप्रवेशाच्या प्रतीक्षेतच! https://tinyurl.com/5n6dtrxs एखादा स्वाभिमानी माणूस असता तर मुंबईत भाड्याने घर घेऊन राहिला असता; धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊनही सरकारी बंगला न सोडल्याने अंजली दमानिया संतापल्या https://tinyurl.com/2y5sc7jh
5. धाराशिवमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का, परांड्याचे माजी आमदार राहुल मोटे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार https://tinyurl.com/58yfwx54 शिवसेनेचा बाप मीच, भाजप नेते परिणय फुकेंचं वक्तव्य, तर 12 तासांच्या आत जाहीर माफी मागावी अन्यथा आम्ही त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ; शिंदेंच्या शिवसेनेचा संताप https://tinyurl.com/yv2kcakt
6. पुण्यात दलित मुलींच्या छळाची तक्रार घेण्यास पोलिसांची टाळाटाळ, प्रकाश आंबेडकरांचा पोलिसांना फोन, निर्वाणीचा इशारा https://tinyurl.com/m2hbc8dh सहकाऱ्यांना वाचवण्यासाठी पोलिसांनी अॅट्रोसिटीची तक्रार घेतली नाही, कोथरुडमध्ये दलित मुलींचा छळ, सुजात आंबेडकर संतापले; रोहित पवारांकडून पोलिसांना खडे बोल https://tinyurl.com/24234njk पुण्यात झुंडशाहीने पोलिसांवर दबाव आणला, पुरावे नसताना अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्याची मागणी, भाजपचा रोहित पवारांवर पलटवार https://tinyurl.com/ymfkevve
7. पीएसआय कामठेचा विकृत स्पर्श, कॉन्स्टेबल शिंदेंनी कमरेत लाथा घातल्या; पुण्यातील पीडित तरुणीने स्टार्ट टू एंड सगळं सांगितलं https://tinyurl.com/hwkpdhp7 पोलिसाने डोळ्यांनी माझं शरीर स्कॅन केलं, मग अंगावर आले अन् चुकीचा स्पर्श केला, पुण्यातील पीडित तरुणींच्या तक्रारीतील संपूर्ण माहिती एका क्लिकवर https://tinyurl.com/4yc6u6vw
8. झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; दिल्लीत घेतला अखेरचा श्वास, लढवय्या चेहरा काळाच्या पडद्याआड https://tinyurl.com/5t3ye87u केरळमधील 2 रुपयांवर उपचार करणारे डॉक्टर गोपाल यांचं निधन, 50 वर्षे रुग्णसेवा; मुख्यमंत्र्यांकडूनही शोक व्यक्त https://tinyurl.com/279e3uwc
9. चिमुरडीवर बलात्कार करुन हत्या करणारा आरोपी फरार, सुनावणीसाठी आल्यानंतर बेसावध पोलिसांच्या हातावर तुरी; भिवंडीतील धक्कादायक प्रकार https://tinyurl.com/y4uv96tz आई-वडिलांनी नवा मोबाईल न दिल्याने 16 वर्षीय मुलानं आयुष्य संपवलं; छत्रपती संभाजीनगरातील घटना https://tinyurl.com/bdz6k6fr सैन्य दलातून सुट्टी घेत घर गाठलं, जवानानं दारुच्या नशेत कार चालवत 30 जणांना कट मारला, जमावाने चोपला; नागपूरमधील घटना https://tinyurl.com/mwe3z45s
10. इंग्लंडविरोधातील पाचव्या कसोटीत भारताचा 6 धावांनी रोमांचक विजय, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाने साहेबांच्या तोंडचा घास पळवला, 5 सामन्यांची मालिका 2-2 अशी बरोबरीत https://tinyurl.com/3rebvnua ना कधी विश्रांती घेतली, ना कामाचा लोड; मोहम्मद सिराज ठरला टीम इंडियाचा हिरो, विजयानंतर म्हणाला स्वत:वर विश्वास ठेवला https://tinyurl.com/3h2f8n2n ओव्हल कसोटीनंतर WTC पॉइंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ, टीम इंडियाची तिसऱ्या क्रमाकांवर झेप, तर पराभवानंतर इंग्लंडची चौथ्या स्थानावर घसरण https://tinyurl.com/454dc2bb
एबीपी माझा स्पेशल
पुण्यातील मानाच्या गणपतींच्या विसर्जनाच्या वेळेत बदल होणार? प्रत्येक मंडळासोबत एकच ढोलपथक? महत्त्वाची अपडेट समोर https://tinyurl.com/ybrv3w5t
भारतीय नौदलात नोकरीची मोठी संधी! पगार मिळणार 56 हजार रुपये, कसा कुठे कराल अर्ज? काय आहे पात्रता? https://tinyurl.com/4bs2584t
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w
























